Ghatkopar Railway Station Saam Tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Railway Station: ३ ब्रीज, एलिव्हेडेड डेक अन्...; घाटकोपर रेल्वे स्टेशनचा कायापालट, प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका

Ghatkopar Railway Station Redevelopment Progress: घाटकोपर रेल्वे स्टेशनबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. या रेल्वे स्थानकावर अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

Priya More

Summary -

  • घाटकोपर स्थानकावर एलिव्हेटेड डेक आणि १२ मीटरचे तीन नवीन पूल उभारले जात आहेत

  • गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवासी वाहतूक सुलभ करण्यासाठी मोठा मेकओव्हर सुरू आहे

  • डेक आणि दोन फूटओव्हरब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे

  • मेट्रो-रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासी संख्या वाढत असल्याने मोठे बदल केले जात आहेत

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. या रेल्वे स्थानकावर एलिव्हेटेड डेक आणि ३ पुलांचे काम वेगान सुरू आहे. भविष्यामध्ये घाटकोपर रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली आणि अंधेरी रेल्वे स्थानकांप्रमाणे होईल आणि याठिकाणावरून प्रवास करताना प्रवाशांची गर्दीतून सुटका होईल.

पावसाळ्यानंतर घाटकोपर रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या तीन पूर्व-पश्चिम पुलांपैकी दोन पुलांचे काम वेगाने सुरू आहे. फेज- २ अंतर्गत घाटकोपर रेल्वे स्थानक सुधारणा प्रोजेक्ट हळूहळू पुढे जात आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची वाहतूक वाढवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच घाटकोपर रेल्वे स्थानकावर अनेक मोठे बदल करण्यात येत आहे.

या प्रोजेक्टमध्ये नवीन एलिव्हेटेड डेकचे बांधकाम, उत्तर आणि दक्षिण टोकांवर १२ मीटर रूंदीचे दोन फूट ओव्हरब्रिज आणि अतिरिक्त प्रवाशांच्या सुविधांचा समावेश असणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूच्या एलिव्हेटेड डेकचे काम वेगाने सुरू आहे. नियोजित १५ पैकी ६ पाया पूर्ण झाले आहेत. १२ मीटर रूंदीच्या दक्षिण फूट ओव्हर ब्रीजचे काम देखील सुरू आहे. पुलाच्या ३ स्पॅनपैकी एकासाठी मुख्य गर्डरचे काम आधीच सुरू झाले आहे. तर आणखी एका फूट ओव्हर ब्रीजचे काम देखील प्रगतीपथावर आहे.

उत्तर फूट ओव्हर ब्रीजच्या बाजूला असलेली एक अनावश्यक रेल्वे गँग-हट स्टेशन परिसरात नियुक्त केलेल्या जागेवर स्थलांतरित केल्यानंतर ती पाडण्यात आली आहे. रिकामी केलेली जागा आता उत्तर फूट ओव्हर ब्रीजच्या पायाभरणीच्या कामासाठी वापरली जाणार आहे. एकदा जागा पूर्णपणे मोकळी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नवीन १२ मीटर रुंदीच्या उत्तर फूट ओव्हर ब्रीजचे बांधकाम सुरू करण्याचा प्लान तयार केला आहे. सात-पाईंटच्या घाटकोपर अपग्रेड प्रोजोक्टमध्ये रुंद एलिव्हेटेड डेक आणि बोरिवली आणि अंधेरी स्थानकांसारखे तीन अतिरिक्त १२ मीटर पूल समाविष्ट आहेत जे त्यांना एकत्र जोडतील.

दरम्यान, मुंबई मेट्रो लाईन १ स्टेशन परिसराशी जोडल्यामुळे घाटकोपर हे एक महत्त्वाचे जंक्शन झाले आहे. कारण येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असतात. घाटकोपर रेल्वे स्थानकावर दररोज चार लाख प्रवासी येतात आणि गर्दीच्या वेळी येथे मोठी गर्दी होत असते. मेट्रोच्या प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे याठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठी गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा रेल्वे आणि मेट्रो प्रवास सोपा व्हावा यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये अनेक बदल केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry: ड्रग्ज प्रकरण चौकशीनंतर ओरीचा बेभान नाचताना व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला जगू द्या...'

Maharashtra Politcs: ५० खोके ही घटना सत्यच, शिंदेंच्या आमदारावर भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप|VIDEO

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Winter Skin Care : सावधान! हिवाळ्यातही चेहऱ्याला वारंवार बर्फ लावताय? मग 'ही' गोष्ट लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT