Best Bus Fire video  Saam Tv
मुंबई/पुणे

Video : मुंबईत बेस्ट बसला आग; प्रसंगावधान राखत प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला

मुंबईत बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सूरज सावंत

Best Bus Fire : मुंबईत बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या वांद्रे येथे बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. (Latest Marathi News)

मुंबईत (Mumbai) लोकल ट्रेननंतर बेस्ट बस (Bus) या सार्वजनिक वाहनातून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईकरांच्या दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील एसव्ही रोड येथे बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. बसला आग लागल्यानंतर प्रवासी नागरिकांमध्ये एकच भीती पसरली. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी प्रसंगावधान राखत उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

बेस्ट बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांकडून बसवर पाणी फवारून बसवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेत सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. बेस्ट बसला आग का लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बेस्ट बसला अचानक आग लागण्याच्या घटना वाढल्याने बस प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

SCROLL FOR NEXT