Mumbai News in Marathi: Action Taken Against Three Nurses Of Bmc As An Adhesive Tape Applied To The Mouth Because The Baby Cries Continuously. Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: बाळ सतत रडतं म्हणून तोंडाला लावली चिकटपट्टी; BMCच्या तीन नर्सेसवर कारवाई

Bhandup News: बाळासोबत घडलेली ही घटना २०२३ ची आहे. बदलापूर येथे राहणाऱ्या प्रिया कांबळे यांच्या बाळावर भांडूप येतील पालिका रुग्णालयात उपचार सुरु होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Latest News:

बाळ सारखं रडतं म्हणून ३ नर्सेसने बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा प्रकार समोर आला होता. मुंबई महानगरपालिकेच्या भांडूपमधील रुग्णालयात ही घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही नर्सेसवर गुन्हा दाखल केला आहे.

बाळासोबत घडलेली ही घटना २०२३ ची आहे. बदलापूर येथे राहणाऱ्या प्रिया कांबळे यांच्या बाळावर भांडूप येतील पालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्वचा पिवळसर झाल्याने बाळाला ३१ मे २०२३ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रिया २ जून २०२३ रोजी आपल्या बाळाला नेण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचं प्रिया यांच्या निदर्शनास आलं. बाळाच्या हनुवटीला, मानेला चिकटपट्टी लावल्याचं दिसून आलं. प्रिया यांनी सर्व चिकटपट्टी काढली. या चिकटपट्टीमुळे बाळा पुरळ देखील उठले होते.

याबद्दल प्रिया यांनी तेथील नर्सेसना जाब विचारला. त्यावेळी बाळ रडत असल्याने चिकटपट्टी लावाली लागते, यात काही नवीन नाही. उगाच गोंधळ घालू नका असं नर्सने सांगितलं. या घटनेनंतर कांबळे यांनी तातडीने रुग्णायातून बाळाला डिस्चार्ज देण्याची मागणी केली. प्रिया यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नगरसेवकाने देखील रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाव विचारला.

काही महिन्यांनी वकील तुषार भोसले यांनी याबाबत मराराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर मानली हक्क आयोगाने मुंबई महापालिका आणि पोलिसांना याबाबत समन्स पाठवलं. पोलिसांनी या समन्सची दखल घेत तीन नर्सविरोधात कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT