Auto driver saves life of burnt woman saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: धर्माची भिंत तोडून माणुसकी जिंकली! ऑटो चालकाने वाचवले पेटलेल्या महिलेचे प्राण

साम टिव्ही ब्युरो

Auto driver saves life of burnt woman: मुंबईत अण्णाभाऊ साठे पुलाखाली एक महिला पेटवलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदतीसाठी याचना करत होती. रोडवरून अनेक वाहनं वेगाने पुढं जात होती. पण कोणी वाहन थांबून महिलेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परंतु एका रिक्षा चालकाने माणुसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

या पेटलेल्या महिलेला पाहताच एका रिक्षा चालकाने त्याचे भाडे आणि रोजी रोटीसाठी करत असलेली कमाई सोडून तिच्या मदतीसाठी धाव घेतली. पेटलेली महिला दिसताच त्याने स्वतःचे वाहन थांबवून गाडीतील पाण्याची बॉटल घेतली आणि पेटलेल्या महिलेच्या अंगावर ओतून आग विझवली. त्यानंतर त्याने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील केले.

मोहम्मद इस्माईल शेख असं या महिलेसाठी देवदूत ठरलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. जखमी महिला सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचार घेत असून मोम्महद इस्माईल शेखने केलेल्या मदतीमुळे ती केवळ दहा टक्के भाजलेली आहे. मोहम्मद शेखने त्याच्या या मदतीच्या भावनेतून माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण समोर ठेवले आहे.

विशेष म्हणजे मोहम्मद इस्माईल शेख मुस्लीम धर्मीय आहे आणि जळणारी महिला हिंदू धर्मीय होती. परंतु मोहम्मद शेखने जाती धर्माची भिंत तोडून "हम सब एक है" या घोषवाक्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. (Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही चुनाभट्टी येथील सुमन नगर येथील रहिवाशी आहे. वडाळा रोड येथे कामाला जाण्यासाठी बुधवारी सकाळी 08:00 वाजण्याच्या सुमारास ती अण्णाभाऊ साठे ब्रिजजवळ असलेल्या बस स्टॉपवर आली. यावेळी तिचा पती देखील तिच्या मागे अचानक आला आणि त्याने अचानक तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र तेवढ्यात इस्माईलने केलेल्या मदतीमुळे तिचे प्राण वाचले आहेत. (Breaking News)

इस्माईलच्या या धाडसाचं आणि माणुसकीचं कौतुक करून नेहरूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ सौदागर यांनी त्याचा सत्कार केला. तसेच यापुढेही समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT