crime news SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: बंदुकीच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न, मग खंडणीची मागणी... अभिनेत्यासोबत हायवेवर थरकाप उडवणारा प्रसंग

अभिनेता अनुशील चक्रवर्तीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बंदुकीच्या धाकावर खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

सूरज सावंत

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता अनुशील चक्रवर्तीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बंदुकीच्या धाकावर खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुशील हा 6 जानेवारी रोज रात्री 1 वाजता घाटकोपरच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवरून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याची गाडी अडवली. अज्ञात व्यक्ती बंदुकीच्या धाकावर गाडीत बसला आणि त्याने अनुकूलकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. (Mumbai Crime News)

या प्रकरणी अनुशीलने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनुशीलच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात 364 अ, 386,323, 506(2), 34, भादवि 25,3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो गुन्हा पुढील तपासासाठी घाटकोपर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT