Mumbai : एकाच मुलीवर जडला दोन जिवलग मित्रांचा जीव अन्...पुढे काय...; मुंबईतील धक्कादायक घटना

जिवलग मित्रावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
mumbai crime News
mumbai crime News Saam Tv

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम त्रिकोणातून महाविद्यालयीन तरुणाने आपल्या जिवलग मित्रावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात जयेश सावंत हा वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

mumbai crime News
Barshi News : आमदार राऊत यांच्यासह ६ जणांची निर्दोष मुक्तता; काय आहे १८ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

मालाड पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी हल्लेखोर तरुण आयुष खेडकर (२० वर्षे) यास 24 तासात अटक केली आहे. दोघेही मुंबईच्या गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटेल, अशी या हल्ल्याची कथा आहे. गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जयेश सावंत आणि आयुष खेडकर या दोघांचे याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर प्रेम होते. जयेश सावंत याचे एका मुलीवर मागील सात वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र त्या दोघांचाही काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर त्या तरुणीच्या आयुष्यात आयुष खेडकर हा तरुण आला.

मात्र जयेश आपले गमावलेले प्रेम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ही बाब आयुष्य खेडकर याला खटकत होती. आपल्या प्रेमात अडथळा नको या इराद्याने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. यासाठी आयुष खेडकर याने जयेश ला आपल्या घरी असलेले पाळीव पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी बोलावले.

जयेश सावंत यांनी आयुष खेडकर या आपल्या मित्रावर विश्वास ठेवून शुक्रवारी रात्री त्याच्या बाईकवर बसून घरी गेला. मात्र घरात प्रवेश करतात पाठीमागून आयुष खेडकर याने जयेश सावंत याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला.

mumbai crime News
Kerala News : ऑनलाईन ऑर्डर केलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; केरळमधील धक्कादायक घटना

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयेश याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आता जयेश याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी भादवी कायद्यानुसार 307 चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आयुष्य खेडकर याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com