Ajay Maharaj Baraskar Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

VIDEO: 'मराठ्यांसाठी देह गेला तरी चालेल', अजय महाराज बारसकर आक्रमक, 'सागर' बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन, नेमकं काय घडतयं?

Ajay Baraskar Protest At Sagar Bunglow : फडणवीस यांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. २० जुलै २०२४

काही दिवसांपूर्वीच आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेले अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा खळबळजनक आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. यावरुनच बारसकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. फडणवीस यांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय म्हणाले अजय बारसकर?

"आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात माझी गाडी जाळली. मी थांबलो तेव्हा काही लोक माझी चौकशी करत होते. त्यापूर्वी मला १०-१२ धमकीचे फोन आले होते. रात्री २ वाजता माझी गाडी जाळली. मला मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली नाही. म्हणून मी वेगळा झाला. मी समाजाच्या विरोधात नाही," असं अजय महाराज बारसकर म्हणाले.

तातडीने सागर बंगल्यावर

"जरांगे पाटील म्हणाले की मी सागर बंगल्यावर जातो. एवढ्या आवेशात म्हणालात तर गेला का नाहीत? तुम्ही गेला नाहीत आता मी जाणार, पोलिसांनी काय करायच ते करा, माझा मृत्यू झाला तरी तो मराठा समाजासाठी असेल. मी फडणवीस यांना भेटणार असं म्हणत चालू पत्रकार परिषदेतून अजय महाराज हे सागर बंगल्यावर दाखल झाले.

रस्त्यावर ठिय्या आंदोलन..

"देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार आहे. मी फडणवीसांचा माणूस आहे, असा शिक्का माझ्यावर लावला. बलात्काराचा आरोप केला. माणसाला उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असं म्हणत मराठ्यांसाठी देह गेला तरी चालेल अशी आक्रमक भूमिका बारसकर यांनी घेतली आहे. दरम्यान," त्यांच्या या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT