Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसले

Manoj Jarande Patil Start Hunger Strike: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसले आहेत. 'आरक्षणावर आम्ही ठाम. सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात.', अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यादा उपोषणाला बसले
Manoj Jarande PatilSaam Tv
Published On

माधव सावरगावे, जालना

मराठा समाजाला (Maratha Samaj) आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarati) आजपासून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्य सरकारने अजूनही सरसकट आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'आरक्षणावर आम्ही ठाम. सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात.', अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'सरकारने मराठा समाजाला धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची वेळ आली. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सरकारला मागण्या माहीत आहेत. त्याच त्या मागण्या पुन्हा सांगण्याची गरज आहे. नोंदी शोधल्या जात नाहीत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हैदराबादहून आणलेले पुरावे पहावेत. आता बहाणे नको, तुम्हाला खूप वेळ दिला. नोकर भरती, शाळेच्या प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. एसईबीसी- ईडब्ल्यूएस- कुणबी प्रमाणपत्रे अडचणी येत आहेत. ते लागू करीत नाहीत.'

Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यादा उपोषणाला बसले
Sharad Pawar: 'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची 'तुतारी' फुंकली!

तसंच, 'प्रत्येक वेळी सरकार वेगवेगळे निर्णय घेते. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. तिन्ही पर्याय ठेवा नाहीतर ते ओपनमध्ये अर्ज करतील.विद्यार्थ्यांना नोकर भरतीमध्ये मराठा मुलांना प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या. मुलींना शिक्षण मोफत केले पण ते दिले जात नाही. केजी टू पिजी मोफत मुलींना शिक्षण केले पण ते व्यवस्थित केले नाही. सरकारला जितका वेळ पाहिजे होता तो दिला. सगे सोयरे बाबत निर्णय घ्या. काय हरकती आहेत ते तुम्ही पाहा. सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदलली नाही.' , असे त्यांनी सांगितले.

Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यादा उपोषणाला बसले
Sharad Pawar News: पिपाणी 'बंद', तुतारी वाजणार! शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा; पिपाणी चिन्ह गोठवलं

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्याबदद्दल बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'हिंगोलीतील पोलिस भरतीत कुणबी प्रमाणपत्र असताना पोलिसांनी ओपनमध्ये अर्ज कर म्हणून लिहून घेतले. सगळी कागदपत्रे असताना संमतीपत्र पोलिसांनी लिहून घेतले. काही जातीयवादी पोलिस अधिकाऱ्याकडून चाले सुरू आहेत. बोगस कागदपत्रे करून आयएएस करता आणि खरे कागदपत्रे असताना आमच्यावर अन्याय करता. सगळ्या परीक्षेत प्रवेशात सरकार आमच्यावर अन्याय का करतंय? तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचे नाही, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही, मुस्लिमांना आरक्षण द्यायचे नाही. तुम्हाला यांना न्याय द्यायचा नाही आणि लाडका भाऊ- लाडकी बहीण आणायचे.'

Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यादा उपोषणाला बसले
Ajit Pawar Pink Jacket: विधानसभेआधी दादांची 'गुलाबी' रणनिती? अजित पवारांनी गुलाबी जॅकेट का शिवलं?

सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'आरक्षण मुद्दा सोडून नव्या योजना आणून सरकारने लोकांना वेगळ्या विषयात गुंतवून ठेवले आहे. लाडकी बहीण -लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी आणि मेहुणा आणतील. तुमच्या लाडक्या बहीण - भाऊ योजानेमुळे साइट बंद पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अॅडमिशन होत नाहीये. वेबसाइट लोड होत नाहीये. सरकार डाव टाकत आहे. सरकार खूप चालू आहे. आता लाडका मेहुणीची तयारी सुरू केली आहे. तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि सर्वकाही बंद होईल.'

Manoj Jarande Patil: मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पेटणार?, जरांगे पाटील पाचव्यादा उपोषणाला बसले
Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार; फडणवीसांवरील टीकेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com