Sharad Pawar: 'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची 'तुतारी' फुंकली!

Sharad Pawar Sabha Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले.
'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!
Sharad Pawar Sabha Ahmednagar: Saamtv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. १९ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्यास ते उपस्थित राहिले. यावेळी अकोलेमध्ये शरद उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा पार पडला. खासदार निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले.

'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!
Jalgaon Accident: जळगावमध्ये थरारक अपघात! भरधाव कारने ५ महिला, २ चिमुकल्यांना उडवलं; १ जागीच ठार

काय म्हणाले शरद पवार?

"बळीराजासाठी सत्ता वापरणे हे सूत्र राज्यकर्त्यांचे असले पाहिजे. मात्र देश आज वेगळ्या संकटातून जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धांद्याकडे बघितले जाते, मात्र आज त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचे पीक घेतो. त्याला रास्त दर मिळावा एवढीच मागणी असते,"

"मात्र कांद्याला दर मिळत नाही. मोदींच्या नाशिकच्या सभेत एक शेतकरी उठला आणि म्हणला तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला भाव द्या' पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत टाकलं. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही. हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये समोर आलं," असा टोला शरद पवार यांनी लगावला.

'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!
BJP Politics: भाजपकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू; रात्री उशिरापर्यंत खलबतं, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

"आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणी शेतकरी यांची आस्था नाही. आता तुमची आमची जबाबदारी आहे. लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलंय. पाच वर्षापूर्वी काॅग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे," असं शरद पवार म्हणाले.

"लोकसभेने एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे. आता तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही, आता काही मागायचं नाही ठरवलंय. तुम्ही मला अनेकदा निवडून दिलयं, आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायच आहे. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवीय' असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

'थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही', नगरच्या सभेतून शरद पवार गरजले; विधानसभेची तुतारी फुंकली!
Chhatrapati Sambhajinagar Crime: खळबळजनक! वाळुज MIDC परिसरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com