Ujjwal Nikam Saam Tv
मुंबई/पुणे

Ujjwal Nikam: ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप, नियुक्ती रद्द करण्याची हायकोर्टाकडे मागणी; प्रकरण काय?

Special Public Prosecutor Ujjwal Nikam: ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला एका आरोपीने आव्हान दिले आहे. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी या आरोपीने कोर्टाकडे केली आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर १० जून रोजी ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. उज्ज्वल निकम यांच्या पुनर्नियुक्तीला काँग्रेसने विरोध केला होता. अशामध्ये आता ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला एका आरोपीने आव्हान दिले आहे. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी आरोपीने मुंबई हायकोर्टाकडे केली आहे. उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेला विजय पालांडेने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला कोर्टामध्ये आव्हान दिले आहे. विजय पालांडेने केलेल्या याचिकेमध्ये उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडेने याचिकेत म्हटले आहे.

निकम यांनी उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,००० हून अधिक मतांनी पराभव केला. ॲड. निकम यांची पालांडेच्या खटल्यात पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप सरकारने निकम यांची नियुक्ती कुहेतूने केली असून त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार निकम करतील. आता लोकांच्या नजरेत निकम यांचा हेतू, अजेंडा पूर्णपणे बदलला आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल., असे पालांडेने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २५ प्रकरणांचा राजीनामा दिला आहे. निवडणूक लढवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी २५ प्रकरणांमध्ये एसपीपी पदाचा राजीनामा दिला होता. पण या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने उज्ज्वल निकम यांनी निवडणुकीपूर्वी हाताळलेल्या सर्व खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. ही अधिसूचना १० जूनपासून लागू करण्यात आली होती.

दरम्यान, आरोपी विजय पालांडे अनेक हत्या प्रकरणातील आरोपी आहे. २०१२ पासून पालांडे न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्यूसर करणकुमार कक्कड यांची हत्या केल्याचा आरोप विजय पालांडेवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT