Mumbai Nalasopara News
Mumbai Nalasopara News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : डॉक्टरांची एक चूक अन् बाळाचा कापावा लागला हात, मुंबईतील धक्कादायक घटना

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

नालासोपारा : मुंबईच्या (Mumbai) नालासोपारा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नवजात बालकावर चुकीचा उपचार केल्याने या बालकाला आपला हात गमवावा लागला आहे. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठाण्यात (Police) वसई विरार महापालिका वैद्यकिय विभाग आणि जिल्हा शल्य चित्किसक अधिकारी यांच्याकडे पालकांच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला आहे. पण अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली वाला नामक महिला नालासोपारा येथील त्रिवेणी खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. ५ ऑक्टोबर रोजी या महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यावेळी दोनही बालके निरोगी आणि उत्तम स्वास्थ्य असल्याचे येथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

मात्र, एका बाळाची शुगर कमी असल्याने त्याला सलाईन लावावे लागेल, असे सांगत डॉक्टरांनी त्याला सलाईन लावले. त्यानंतर बाळाचा उजवा हात काळा पडत गेला. याबाबत अंजली वाला यांनी डॉक्टरांना विचारणा केली असता. त्यांनी मालीश करुन जाईल असे सांगितले. तरी सुद्धा बाळाच्या तब्बेतीत काहीच सुधारणा होत नसल्याने पालकांनी बाळाला वाडीया रुग्णालयात दाखल केलं.

यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या हाताला गॅंगरिन झाला असल्याचे सांगत बाळाचा हात निकामी झाल्याचे सांगितले. यामुळे या बाळाचा उजवा हात कापण्यात आला. या संदर्भात माहिती देताना जिल्हा शल्य चित्किसक अधिकारी डॉक्टर संजय बोदाडे यांनी माहिती दिली की, या संदर्भात अर्ज प्राप्त झाला आहे. या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करुन अहवाल सादर केला जाईल.

नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सुध्दा वैद्यकीय तक्रारीच्या अनुशंगाने पोलीसांना सरळ गुन्हा दाखल करता येत नसून त्यावर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची आवश्यकता असते. यामुळे पालकांचा अर्जावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT