Pimpri Chinchwad Hoarding Accident: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळल्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: होर्डिंगचा मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून (MIDC Bhosari Police) सुरू आहे.
Pimpri Chinchwad Hoarding Fall: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळल्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा
Action Against Owner and Person Who Done Structural Audit in Pimpri-Chinchwad Hoarding Accident CaseSaam Tv

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Collapsed) १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये गुरूवारी होर्डिंग कोसळल्याची (Pimpri Chinchwad Hoarding Collapsed) घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंगचा मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून (MIDC Bhosari Police) सुरू आहे.

Pimpri Chinchwad Hoarding Fall: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळल्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा
Pimpri-Chinchwad Hoarding Collapsed : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागात गुरूवारी वादळी वाऱ्यामुळे एक मोठे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या होर्डिंग दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्या होर्डिंगच्या मालकावर आणि होर्डिंगच्या स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.

होर्डिंगचा मालक आनंद गांधी आणि होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करणारे हेमंत कुमार शिंदे यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यामध्ये भादवी ३३६, ४२७ आणि ३४ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जे होर्डिंग कोसळले ते अधिकृत असून या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट योग्य पद्धतीने न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने रेड झोन मध्ये होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिलीच कशी ? हा प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Pimpri Chinchwad Hoarding Fall: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळल्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा
Pune Breaking News: पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

दरम्यान,पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावलामुळे जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले हे होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली चार दुचाकी आणि टेम्पो अडकले होते त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

Pimpri Chinchwad Hoarding Fall: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळल्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा
Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणाची केली निर्घृण हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com