Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

कुर्ल्यात ४ मजली इमारत कोसळली; अनेकजण दबल्याची भीती

या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील (Mumbai) कुर्ला एल विभागातील नेहरुनगर येथील नाईकनगर सोसायटीतील एक इमारत कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच नेहरूनगर पोलीस (Police) ठाण्याचे कर्मचारी व चेंबूर अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले.

आतापर्यंत १३ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अजूनही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेली माहिती अशी, कुर्ला येथील नाईक नगरमध्ये रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेकांना यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

ढिगाऱ्या खालून आतापर्यंत ५ जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे, तर आणखी काहीजण यात अडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Priyadarshini Indalkar: 'अधुरी बातों की तरह...'; 'दशावतार' निमित्त प्रियदर्शनी इंदलकरचा दिलकश अंदाज

'कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा...'मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून पक्षाला जय महाराष्ट्र, मनातील खदखद बोलून दाखवली

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Samruddhi Kelkar: नथीचा नखरा! मराठमोळ्या समृद्ध केळकरचं सौंदर्य पाहताच खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT