यंदा पीओपीच्या गणेश मूर्तीची स्थापना करू नका; मुंबई महापालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, त्याऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे
Ganesh festival
Ganesh festival saam Tv

सुमित सावंत

मुंबई : पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात (Ganesh Festival) प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, त्याऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फुटापेक्षा अधिक नसावी, अशी विनंती देखील महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ( Mumbai Latest News In marathi )

Ganesh festival
'शिंदे साहब हम आपके साथ है'! आसाममध्ये झळकले एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ बॅनर

यंदाचा गणेशोत्‍सव जवळ येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व गणेश भक्त, गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांना विनंती करण्यात येते की, पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने आणि जल प्रदूषण रोखण्‍यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घडवलेल्या गणेश मूर्तीची स्‍थापना करु नये. कारण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीचे अनेक दुष्‍परिणाम आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्‍यात विरघळत नाही. त्‍यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो.

Ganesh festival
माकडाला चिप्स द्यायला गेला अन् पर्यटक दरीत कोसळला; त्यानंतर...

दरम्यान,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्‍या नियमावलीनुसार प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्ती वापरास / विक्रीस बंदी आहे, त्‍यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीची विक्री किंवा खरेदी करु नये. गणेश भक्‍तांना विनंती करण्‍यात येते की, शाडू मातीच्‍या गणेश मूर्तीची स्‍थापना करावी. घरगुती गणेश मूर्ती ही २ फूटांपेक्षा जास्‍त उंच नसावी. असे केल्‍याने ह्या मूर्तींचे विसर्जन नजीकच्‍या कृत्रिम तलावामध्‍ये करणे सोयीस्कर होईल. गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com