५० कोटींचा पाऊस पाडण्यासाठी भोंदुबाबांनी केली पूजा, व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा; चार संशयित अटकेत

पैशांचं पाऊस पाडण्याचं प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे.
Money fraud
Money fraudsaam tv

डोंबिवली : येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांचं पाऊस पाडण्याचं प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. ५० कोटींचा पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवून (Money Fraud case) एका टोळीने ठाकुर्लीतील एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ५६ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेले सुरेंद्र पाटील यांनी मानपाड्या पोलीस ठाण्यात (Manpada Police station) तक्रार दाखल केली. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली असून गणेश, शर्मा गुरुजी, अशोक गायकवाड, महेश व मोकळे या आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी (Four culprit arrested) ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

Money fraud
भाजपच्या बैठकीत खलबतं! बंडखोर आमदार म्हणजे २४ कॅरेट शिवसैनिक, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शेखर बागडे यांनी दिलेली माहिती अशी की,व्यावसायिक सुरेंद्र पाटील ठाकुर्ली चोळेगाव येथील रहिवासी असून दावडी गावात पाटीदार भवन येथे त्यांचे कार्यालय आहे. पाटील यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने दहाटक्के पैसे पूजेसाठी दिले होते. त्यानंतर ५० कोटींचा पाऊस पाडून देतो असं आमिष त्यांनी दाखवलं होतं. त्यानुसार 56 लाखांची रक्कम सुरेंद्र यांनी तयार ठेवली. शनिवारी रात्री या भोंदूबाबाच्या टोळीने त्याच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पुजा सुरू केली.

Money fraud
महिंद्राची Scorpio-N नव्या अवतारात, जाणून घ्या सविस्तर माहिती

पहाटेच्या सुमारास या टोळीने सुरेंद्रला त्याच्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. सुरेंद्रने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी या टोळीने संधीचा फायदा घेत त्यांना दिलेले ५६ लाख रुपये घेवून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठले.अशोक गायकवाड,रमेश मुकणे,संजय भोळे ,गणेश,शर्मा गुरुजी नावाच्या पाचही जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com