महिंद्राची Scorpio-N नव्या अवतारात, जाणून घ्या सविस्तर माहिती

महिंद्रा स्कॉर्पिओचा नवा अवतार महिंद्रा कंपनीकडून नुकताच लॉंच करण्यात आला आहे.
Mahindra Scorpio N Latest Update (automahindra डॉट कॉम)
Mahindra Scorpio N Latest Update (automahindra डॉट कॉम)SAAM TV
Published On

मुंबई : भारतात सर्वाधिक पसंतीची कार ठरलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओचा नवा अवतार महिंद्रा कंपनीकडून नुकताच लॉंच करण्यात आला आहे. महिंद्राची नवीन कार Scorpio-N डिझाईनच्या बाबतीत आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आहे. या कारच्या फ्रंट लूकला स्पोर्टी टच दिला आहे. हीच या कारची खासीयत आहे. तसेच डिआरएल आणि हेडलॅंपच्या जवळ क्रोम फिनिश असल्याने या कारचा ग्रिल डिझाईन बदलण्यात आला आहे.

Mahindra Scorpio N Latest Update (automahindra डॉट कॉम)
'विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्तेच; बंडखोरांनी काय झाडी, डोंगर, हाटील पाहावे'

त्यामुळे नेक्स्ट जनरेशन मॉडेल Big Daddy of SUVs स्कॉर्पिओ गावापासून शहरापर्यंत धूम ठोकायला आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महिंद्राच्या नव्या SUV कारची प्रतिक्षा अनेकांना लागली होती. अखेर महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ एन या मॉडेलचं लॉंचिग झालं आहे. मार्केटमध्ये जेवढ्या SUV आहेत त्यांची बाप एसयुव्ही Big Daddy of SUVs आता नव्या अवतारात लॉंच करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे.

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओची बुकिंग ३० जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून या कारचे बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे भारतातील ३० मोठ्या शहरात ५ जुलैपासून या कारची टेस्ट ड्राईव्ह सुरु करण्यात येणार आहे. तर इतर शहरात ही एसयुव्ही १५ जुलैपासून टेस्टड्राईव्हला उपलब्ध असणार आहे.

Mahindra Scorpio N Latest Update (automahindra डॉट कॉम)
Maharashtra Politics Live : महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल - नाना पटोले

MAHINDRA SCORPIO N ची वैशिष्ट्ये

इंटिरियरमध्ये बदल

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओमध्ये सीट्सपासून इंटिरियरपर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन स्कॉर्पिओ कमांड सीट्ससोबत मार्केटमध्ये आली आहे. या सीट्समध्ये बसण्याची व्यवस्था उंच केली आहे. अशाप्रकारचे सीट्स कोणत्याही एसयुव्ही कारचे खास वैशिष्ट्ये असतं. तसंच नव्या स्कॉर्पिओचा दरवाजा मागच्या बाजूने उघडता येणार नाही. पाठीमागे असलेल्या सीटवर जाण्यासाठी मधल्या सीटची फोल्डिंग करायची आवश्यकता नाहीय. कारण, तिसऱ्या लाईनच्या सीटवर जाण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली आहे.

दमदार इंजिन

नव्या स्कॉर्पिओमध्ये 2.0 लीटरचे Mstallion चार सिलेंडर, टर्बो पेट्रोल आणि २.२ लीटर mhawk डिझेल इंजिन आहे. हा इंजिन XUV 700 आणि थारमध्येही लावले आहेत. याशिवाय नव्या स्कर्पिओत ६-स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड टार्क कन्वर्टर ऑटोमेटीक ट्रान्समिशन युनिटच्यासोबत मार्केटमध्ये उतरली आहे.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com