Stray Dog In Mumbai Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : सावधान! मुंबईत ९५००० भटक्या कुत्र्यांचा वावर; BMC ने घेतला मोठा निर्णय

Stray Dog In Mumbai: मुंबईत भटक्या श्वानांची दहशत कायम आहे. भटक्या श्वानांच्या लसीकरणाची प्रक्रिया विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू असून पुढील मार्च अखेर मुंबईतील ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

Sandeep Gawade

Stray Dog In Mumbai

मुंबईत भटक्या श्वानांची दहशत कायम आहे. भटक्या श्वानांच्या लसीकरणाची प्रक्रिया विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू असून पुढील मार्च अखेर मुंबईतील ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्याची निर्धार पालिकेने केला आहे. आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्‍या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान सुरू आहे. या अंतर्गत विविध संस्थांच्या साह्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण पुढच्या मार्च अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या पैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याची माहिती पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

विविध संस्थांच्या साह्याने लसीकरण

मुंबईत भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी पालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साह्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Tourism : नंदुरबारचा १२ दिशांतून कोसळणारा बारामुखी धबधबा तुम्ही पाहिला का?

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Infosys Work Policy : आधी ७० तास काम करायचा सल्ला, आता म्हणतात ओव्हरटाइम नकोच, नारायण मूर्तींचा थेट कर्मचाऱ्यांना मेल

Prithvi Shaw : अखेर पृथ्वी शॉचा संघ ठरला, ऋतुराजसोबत सलामीला उतरणार

Mulyachi Bhaji Recipe : नावडती मुळ्याची भाजी आता होणार आवडती, फक्त टाका 'हा' एक पदार्थ

SCROLL FOR NEXT