Navi Mumbai News : नेरुळ जेट्टीत तीन फ्लेमिंगोंचा मृत्यू; मोठं कारण आलं समोर

Flamingo In Navi Mumbai : नेरुळ जेट्टीजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या रहिवाशांना तीन फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले आहेत. फ्लेमिंगो नाम फलकावर आदळत असून त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती पक्षीप्रेमींनी दिली आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam Digital
Published On

Flamingo In Navi Mumbai

नेरुळ जेट्टीजवळ विभागातले रहिवासी मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना रस्त्यावर एक फ्लेमिंगो पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. प्रत्यक्षदर्शींनी त्वरित प्राणीमित्र संघटनांना पाचारण करून फ्लेमिंगोवर उपचार करण्यास सांगितले. परंतु फ्लेमिंगोंची अवस्था बिकट असल्याने उपचारा दरम्यानच फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. असेच आणखी दोन नागरिकांना त्याच ठिकाणी काही अंतरावर दोन आणखी फ्लेमिंगो सापडले. त्यांच्यावरही उपचार करण्यात आले. परंतु ते दोन्ही फ्लेमिंगो पक्षी वाचू शकले नाहीत.

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षी येण्याचा मोसम सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने हे फ्लेमिंगो विदेशातून भारतात भ्रमंती करत अन्नाच्या शोधात येत असतात. परंतु मोसमाच्या सुरुवातीलाच अपघाताने फ्लेमिंगो मृत पावण्याची ही तिसरी घटना घडली असल्याने पक्षी प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी फ्लेमिंगो अपघातत मृत पावल्याची एकच घटना घडली होती. मात्र, या वर्षात फ्लेमिंगो अपघाताच्या तीन घटना घडल्या असून १५ दिवसांच्या काळात ही दुसरी घटना घडल्याने पक्षी प्रेमी चिंतेत आहेत. वर्षभरात मोसमाच्या सुरुवातीला आता पर्यंत ७ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची माहिती पक्षीप्रेमी संघटनांकडून मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षीप्रेमींची प्रशासनाकडे धाव

नेरुळ जेट्टी परिसरातील खाडी भागात मोठयाप्रमाणात फ्लेमिंगोंचा वावर असतो. पक्षीप्रेमी आणि सामान्य नागरिकसुद्धा रस्त्याच्या कडेला थांबून किंवा जेट्टी परिसरात जाऊन फ्लेमिंगोंना पाण्यात विहार करताना पाहण्याचा आनंद घेत असतात. परंतु, जेट्टीकडे येण्याऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या नाम फलकामुळे फ्लेमिंगोंचे नाम फलकाला आदळून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पक्षी प्रेमींनी सांगितले. फ्लेमिंगोंचे थवे आकातून उडत येत असताना पाण्यात उतरतेवेळी नाम फलकाचा अंदाज न आल्याने फ्लेमिंगो नाम फलकावर आदळत असून त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती पक्षी प्रेमी आणि सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेन्ट संस्थेचे अध्यक्ष सुनील अगरवाल यांनी दिली. या बाबत त्यांनी व त्यांच्या संस्थेने सिडको प्रशासनकडे वारंवार तक्रारी देखील दाखल केल्या आहेत.

Navi Mumbai News
MMRDA Marathon : अटल सेतूवर उद्या MMRDA तर्फे मॅरेथॉन, या वेळेत राहणार प्रवेशबंदी? कसं असेल वाहतुकीचं नियोजन? जाणून घ्या

सिडको प्रशासनाची कारवाई

सुनील अगरवाल आणि त्यांच्या संस्थेने सिडको प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर अखेर सिडको प्रशासनाला जाग आली आहे. पक्षी प्रेमींच्या तक्रारीची दखल घेत सिडकोकडून आज (ता.१७ फेब्रुवारी) कथित नाम फलक हटवण्यात आला आहे. सिडकोने केलेल्या कारवाईबद्दल सुनील अगरवाल यांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यकाळात कोणतेही बांधकाम करताना फ्लेमिंगोंच्या प्रवास चक्राची आणि त्यांना माणसांमुळे उडण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती सुनील अगरवाल, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेन्ट यांच्याकडून करण्यात आली.

Navi Mumbai News
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला समोर, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com