Shivajinagar Police Station SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai News: धक्कादायक! अंथरुणात लघवी केल्याने आई संतापली, पोटच्या मुलीला दिले चटके

Shivajinagar Police Station: गोवंडीमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलीने झोपेत अंथरुणामध्ये लघवी केली. त्यामुळे या मुलीची आई चांगलीच संतापली. रागाच्या भरामध्ये आईने आपल्या मुलीला फटके दिले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंथरुणामध्ये लघवी केल्यामुळे संतप्त झालेल्या आईने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला चटके दिले आहेत. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईविरोधात कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police) आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलीने झोपेत अंथरुणामध्ये लघवी केली. त्यामुळे या मुलीची आई चांगलीच संतापली. रागाच्या भरामध्ये आईने आपल्या मुलीला फटके दिले. ही महिला ऐवढ्यावर थांबली नाही तर तिने मुलीला चटके दिले. या महिलेने गॅसवर मोठा चमचा गरम करून मुलीच्या लघवीच्या वरील जागेवर तसंच मांडी आणि पाठीमागच्या खुब्यावर चटके दिले. या महिलेने पती कामावर गेल्यावर मुलीला चटके दिले.

चटके दिल्यामुळे मुलीला दुखापत झाली. चटके दिल्यामुळे मुलगी खूप रडत होती. हे या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. शेजारच्यांनी विचारणा केली असता या महिलेने त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी याप्रकरणी महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कोहिनूरखातून या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८(१), ११५(२) तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला गोवंडीच्या बैंगनवाडीतल्या झोपडपट्टीमध्ये राहते. कोहीनुरखातून खान असं या महिलेचे नाव असून ती पती आणि ४ मुलांसोबत राहते. या महिलेचे दोन लग्न झाले असून पहिल्या पतीपासून तिला दोन आणि दुसऱ्या पतीपासून दोन मुलं आहेत. ती नेहमीच छोट्या छोट्या कारणांवरून मुलांना मारहाण करत असते. तिने आपल्या मुलीला अंथरूणामध्ये लघवी केल्यामुळे तिला चटके दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT