Jalgaon Mahavitaran News : वीजचोरी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दोन वर्षांपूर्वी बजावली होती नोटीस

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर राज्य वीज वितरण कक्षांतर्गत निरूळ या गावात जुलै २०२२ मध्ये वीजचोरीविरुद्ध महावितरणने धडक मोहीम राबविली होती
Mahavitaran News
Mahavitaran NewsSaam tv
Published On

यावल (जळगाव) : महावितरणकडून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी वीज चोरी करताना सापडलेल्या पाच जणांना महावितरणने दंड आकारला होता. मात्र दोन वर्षानंतर देखील दंडाची रक्कम न भरल्याने या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mahavitaran News
Dharashiv News : पाणीपुरवठा करणारे प्रकल्प २५ टक्केच भरले; प्रकल्प भरण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर राज्य वीज वितरण कक्षांतर्गत निरूळ या गावात जुलै २०२२ मध्ये वीजचोरीविरुद्ध महावितरणने धडक मोहीम राबविली होती. खानापूर येथील राज्य वीज वितरण (Mahavitaran) कक्षाचे सहाय्यक अभियंता गणेश सुधाकर दहिभाते यांच्या नेतृत्वाखाली जुलै २०२२ ला वीजचोरीविरुद्ध निरूळ या गावात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत त्यांना माणिक हिरामण पाटील, शिवाजी राधाकिसन पाटील, रामकृष्ण हिरामण पाटील, सुरेश गुलाबसिंग पाटील व संदीप योगराज पाटील हे पाच जण वीजचोरी करताना आढळून आले. या पाच जणांनी वर्षभरात दोन हजार ६७० युनिटची वीजचोरी केली होती.

Mahavitaran News
Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर; ७ लाख भाविक दाखल

तेव्हा या सर्वांना ४३ हजार १२३ रुपयाचा दंड आकारून दंड भरण्यासाठीची नोटीस देण्यात आली. मात्र, या सर्वांनी दोन वर्षांत दंड अदा केला नाही. त्यामुळे यावल पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १५) पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पुढील तपासासाठी हा गुन्हा (Raver) रावेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com