Mumbai Best Bus Accident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Accident : बोरिवलीत भरधाव बेस्ट बसने दुचाकीला उडवलं; ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, आजोबा जखमी

Borivali Best Bus Accident : मुंबईतील बोरिवली परिसरात बेस्ट बसच्या धडकेत एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

मुंबईतील बोरिवली परिसरात मंगळवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. भरधाव बेस्ट बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल केलाय.

मागील काही दिवसांपासून मुंबईत अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसागणित किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे बेस्ट बसच्या धडकेत एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृ्त्यू झाला. मृत चिमुकली आपल्या आजोबासोबत दुचाकीवरून जात होती.

बोरिवली रोडवरील शिंपोली रोड इटोपिया टॉवर येथे दुचाकी आली असता, पाठीमागून आलेल्या बेस्ट बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकीला दूर फटफटत नेलं. यात डोक्याला मार लागल्याने ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातात चिमुकलीचे आजोबा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बस चालक सागर तुलसीदास कोळी (वय ३७) याच्याविरोधात तक्रा दिली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT