सुमित सावंत
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईतही (Mumbai) मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. मुंबईत पाऊस सुरु झाल्यानंतर दरड कोसळणे, इमारत कोसळणे, घरं कोसळणे, झाडे पडणे, शॉर्टसर्किट, समुद्रात बुडणे अशा वेगवेगळ्या दुर्घटना घडत असतात. पावसामुळे दरवर्षी वेगवेगळ्या दुर्घटनेत शेकडो नागरिकांचा जीव जातो. यंदाच्या वर्षीही अशा घटना घडल्याअसून आतापर्यंत वेगवेगळ्या दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai News In Marathi )
मुंबईत मान्सून सक्रिय झाला आहे. ९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली . पावसामुळे शहर आणि उपनगरात दरड कोसळणे, इमारत कोसळणे, घरं कोसळणे, झाडे पडणे, शॉर्टसर्किट, समुद्रात बुडणे अश्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ६७ जण जखमी झाले आहेत .
१ जून ते ७ जुलै २०२२ कालावधीत घडलेल्या सर्व दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत जुन्या, धोकादायक इमारती, घरे कोसळणे, इमारतींचा व घरांचा भाग कोसळण्याच्या एकूण ११४ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, २३ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले आहेत.
- १४ जून रोजी जुहू चौपाटी येथे समुद्रात बुडून ३ जणांचा मृत्यू
- १९ जून रोजी चेंबूर वाशी नाका येथे २ जण जखमी
- २३ जून रोजी चेंबूर येथे गारमेंटचा भाग कोसळून १२ जण जखमी
- २७ जून रोजी दादर येथे झाड कोसळून २ वाहनांचे नुकसान
- २८ जून रोजी कुर्ला येथे इमारत दुर्घटनेत १९ जण मृत तर १४ जण जखमी
- ४ जुलै रोजी कुर्ला, होमगार्ड कार्यलयाजवळ संरक्षक भिंत कोसळून ५ घरांचे नुकसान
- ५ जुलै रोजी दहिसर येथे खदाणीत बुडून २ जणांचा मृत्यू
- ६ जुलै रोजी चुनाभट्टी येथे घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी
प्रकार दुर्घटना मृत जखमी
--------------------------------------------------------
इमारती, घरे ११४ २३ ५१
दरडी कोसळणे १३ ० ०५
झाडे-फांद्या पडणे ५२७ ० ११
समुद्र,नदी,खाडी ०७ ७ ०
नाल्यात पडणे
शॉक लागणे १२ ३ ०
शॉर्ट सर्किट ३५४ ० ०
-----------------------------------------------------------------
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.