गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावासाचा तडाखा बसला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसाचा गडचिरोलीतील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. गडचिरोलीवर आलेल्या नैसर्गिक संकटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान, गडचिरोलीमधील अनेक गावात जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. ( Gadchiroli Flood News Update )
गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गडचिरोली (Gadchiroli) हा प्रवास रस्तामार्गे केला. यात गडचिरोलीच्या सीमेवरील वैनगंगा आणि गडचिरोलीलगत असलेल्या कठाणी नदीच्या पुलावरून त्यांनी पुराची पाहणी केली. पुलावर उतरून त्यांनी अधिकाऱ्यांकडून नद्यांच्या पुराबाबतची माहिती घेतली. वाटेत पुराची स्थिती असलेल्या गावांची या दौऱ्यात त्यांनी पाहणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांना दक्षिण गडचिरोलीतील पूर प्रभावित क्षेत्रात जाता आले नाही. सिरोंचा, भामरागड या भागात पुराचा आणि संततधार पावसाचा मोठा फटका बसला. या भागाची आज हवाई पाहणी ते करणार होते. मात्र, हवामान योग्य नसल्याने हवाई दौरा त्यांना करता आलेला नाही. त्यामुळे ते थेट आढावा बैठकीस उपस्थित झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.