Jalgaon Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: ती भेट अखेरची ठरली! मित्रांवर काळाचा घाला, भरधाव कारची टँकरला धडक, तिघांचा मृत्यू

Chembur Car And Tanker Accident: चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दोन वेळा रस्त्यावर पलटी झाली त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जाऊन धडकली.

Priya More

चेंबूरमध्ये भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात अपघाताची ही घटना घडली आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि या कारने टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या आरसीएफ परिसरामध्ये ही अपघाताची घटना घडली. रविवारी सुट्टी असल्यामुळे चेंबूरच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या मित्रांनी फिरायला जाण्याचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे ते कारमधून वाशीनाका परिसरामध्ये जात होते. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दोन वेळा रस्त्यावर पलटी झाली त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जाऊन धडकली.

या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातातील मृत आणि जखमी हे सर्वजण मित्र होते. यामधील अनेक जण हे ऑटो रिक्षा आणि ट्रक चालक होते. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती गंभीर आहे.

या अपघातामध्ये हरिचरण दास (२३ वर्षे), प्रमोद प्रसाद (३५ वर्षे) आणि हुसेन शेख (४० वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला. तर कार चालक जावेद खान (३० वर्षे), मनोज (३० वर्षे) आणि संजय सिंह (३९ वर्षे) हे जखमी झाले आहेत. अपघातावेळी कार वेगामध्ये होती. चालकाने ब्रेक दाबल्यानंतर कार उलटी झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. अपघातावेळी कारचालक दारूच्या नशेमध्ये होता की नाही याचा तपास पोलिस करत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT