Mumbai News
Mumbai News  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील २७ टक्के नागरिक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त; महापालिका काय पावले उचलणार?

साम टिव्ही ब्युरो

mumbai News : कामाच्या व्याप वाढत असल्याने अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार आणि टीबी या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच मधूमेहाचे प्रमाण देखील मुंबई महापालिकेच्या अहवालातून उघड झाले आहे. मुंबईत २७ टक्के नागरिक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

मुंबईत २७ टक्के नागरिक मधूमेहाच्या आजाराने त्रस्त उघड झाल्यानंतर मुंबईकरांच्या (Mumbai) आरोग्याचा (Health) प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्य विषययक यंत्रणेत वाढ करण्यासंदर्भात भर देण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी प्रदूषण मुक्त मुंबईसाठी पावले उचलली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मुंबईत चाकरमान्यांची संख्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बहुतांश चाकरमानी व्यग्र जीवनशैलीमुळे आरोग्य दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुंबईत मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याची जीवनशैली यास कारणीभूत असून कामाच्या ताणामुळे अनेक लोक स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते.

हिवाळ्यात मधूमेहाच्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे

मधुमेहाच्या समस्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढत आहे भारतामध्ये जवळजवळ 77 दशलक्ष लोक डायबेटिस म्हणजेच मधुमेह ग्रस्त आहेत. मधुमेहाचे टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार पडतात. मधुमेह मुळापासून नष्ट करता येत नाही पण तो नियंत्रित नक्कीच ठेवतात येतो. हिवाळ्यामध्ये मधुमेहाची समस्या अधिक वाढत आहेत. बदलत्या हवामानात मधुमेह (Diabetes) रुग्णांनी स्वतःची जास्ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०2 धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT