Bellasis Bridge  Saam TV
मुंबई/पुणे

Bellasis Bridge Video: १३१ वर्षे जुना बेलासिस पूल आजपासून १८ महिने वाहतुकीसाठी बंद; नेमकं कारण काय?

Bellasis Bridge Closed For Traffic: बेलासिसपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे आणि मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस पूल (Bellasis Bridge) आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. १८ महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) आणि ग्रँड रोडदरम्यान (Grand Road) असणारा हा ब्रिटीशकालीन पूल पुनर्बांधणीच्या कामासाठी पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम १८ महिने चालणार आहे. रेल्वे (Railway) आणि मुंबई महानगर पालिकेने (BMC) हा पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून बेलासिस उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. १३१ वर्ष जुन्या या उड्डाणपुलाची पुर्नबांधणी रेल्वे आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. पुर्नबांधणीमुळे जवळपास १८ महिने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गोखले पूल कोसळल्यानंतर झालेल्या सर्वेक्षणात बेलासिस उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपुलाच्या पुर्नबांधणीच्या कामामुळे वाहनचालक आणि पादचार्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै २०१८ मध्ये कोसळला होता. त्यानंतर मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गोखले पूल कोसळल्यानंतर आयआयटी मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मुंबईतील सर्व पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निर्दशनास आले होते. त्यानंतर बेलासिस पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर हा पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाचे म्हणजे, बेलासिस पूल पाडल्यानंतर या पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करणार आहे. तर पुलाच्या जोडरस्त्याची उभारणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. बेलासिस पूल आजपासून वाहनांसाठी बंद असणार आहे. पण हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरू असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेलासिस पूल आजपसून बंद असल्यामुळे आता वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT