CM Devendra Fadnavis Saam Digital
मुंबई/पुणे

BMC Result: मुंबईत भाजपचीच लाट, शिंदेंचीही बाजी; महायुतीच्या आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

Mahayuti Winning Candidates List: मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. गेली अनेक वर्षे मुंबई महानगर पालिकेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना महायुतीने मोठा झटका दिला. मुंबईत महापौर भाजपचाच होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई महानगर पालिकेत महायुतीने बहुमताचा टप्पा ओलांडला

  • भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे

  • शिंदेसेनेचीही दमदार कामगिरी

  • ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का

  • मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच महापौर होण्याची शक्यता

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये महायुतीचा विजय झाला. महायुतीने ठाकरे बंधूंना जोरदार झटका दिला. मुंबईमध्ये भाजपचे सर्वात जास्त उमेदवार विजयी झाले आहेत. अद्याप काही जागांचा निकाल येणं बाकी आहे. काही जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, महायुती १२५ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप ९५ आणि शिवसेना शिंदे गट ३० जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंची युती ७५ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना ६६ आणि मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेला काँग्रेस पक्ष १५ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी एका आणि इतर ११ जागांवर आघाडीवर आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या २२७ जागांसाठी ५२.९४ टक्के मतदान झालं. मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे. ही मॅजिक फिगर महायुतीने गाठले आहे. महायुतीमध्ये भाजपचे सर्वात जास्त उमेदवार जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेवर भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे. आणखी काही तासांच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या आतापर्यंच्या विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे. कोणत्या वॉर्डमधून कोणता उमेदवार विजयी झाला वाचा लिस्ट...

महायुतीच्या विजयी उमेदवाराची यादी -

वॉर्ड क्रमांक १ - शिवसेना शिंदे गट - रेखा यादव

वॉर्ड क्रमांक २ - भाजप - तेजस्विनी घोसाळकर

वॉर्ड क्रमांक ३ - भाजप - प्रकाश दरेकर

वॉर्ड क्रमांक ४ - शिवसेना शिंदे गट- मंगेश पंगारे

वॉर्ड क्रमांक ९ - भाजप - शिवानंद शेट्टी

वॉर्ड क्रमांक १० - भाजप - जितेंद्र पटेल

वॉर्ड क्रमांक १९ - भाजप - दक्षता कवठणकर

वॉर्ड क्रमांक २० - भाजप- दिपक तावडे

वॉर्ड क्रमांक २१ - भाजप- लीना देहेरकर

वॉर्ड क्रमांक २२ - भाजप - हिमांशु पारेख

वॉर्ड क्रमांक ३५ - भाजप - योगेश वर्मा

वॉर्ड क्रमांक ३६ - भाजप - सिद्धार्थ शर्मा

वॉर्ड क्रमांक ५० - भाजप - विक्रम राजपुत

वॉर्ड क्रमांक ५१ - शिवसेना शिंदे गट- वर्षा टेंबलकर

वॉर्ड क्रमांक ५२ - भाजप - प्रिती सातम

वॉर्ड क्रमांक ६० - भाजप - सायली कुलकर्णी

वॉर्ड क्रमांक ७२- भाजप - ममता यादव

वॉर्ड क्रमांक ८२ - भाजप - अमिन जगदीश

वॉर्ड क्रमांक १०३ - भाजप - होतील गाला

वॉर्ड क्रमांक १०४ - भाजप - प्रकाश गंगाधरे

वॉर्ड क्रमांक १०५ - भाजप - अनिता वैती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut on BMC Election: भाजप ५१, ठाकरे ४९, अजून ६०-७५ जागांचा निकाल बाकी, ठाकरेंना अजूनही विश्वास

Khandeshi Vada Recipe: खान्देशी स्टाइल उडदाच्या डाळीचे कुरकरीत वडे कसे बनवाल? वाचा सिक्रेट रेसिपी

Open Hair Hairstyle: पार्टी ते कॅज्युअल लूकसाठी करा या खास ट्रेंडी हेअसस्टाईल, मिळेल क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह लूक

Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी

Moong Dal Dosa Recipe : वाटीभर मुगाची डाळ अन्...; नाश्त्याला बनवा क्रिस्पी-जाळीदार डोसा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT