Ashwini Bhide likely to take charge as Mumbai’s new BMC Commissioner after key leadership meeting. Saam tv
मुंबई/पुणे

BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे; मुंबईचा कारभार आता 'मेट्रो क्विन'च्या हाती

BMC New Commissioner : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत आयुक्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला. अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

  • फडणवीस-शिंदे बैठकीत निर्णय

  • मुंबई प्रशासनात मोठा बदल

मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याचा सस्पेन्स संपला आहे. बीएमसीच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पाहिजे, यावर चर्चा करण्यासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. अचानक घेतलेल्या या भेटीचं कारण काय होतं हे याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र या भेटीमागील कारण आता समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्यासह मिलिंद म्हैसकर आणि असीम गुप्ता यांच्या नावाची चर्चा होती. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांचे नाव उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे केले होते. पण शेवटी ते मागे पडले.

इतर नावांची चर्चा असताना अश्विनी भिडे यांनी काल सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. यात मुंबई महापालिका आयुक्तपदासह सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा झाली. या बैठकीतच अश्विनी भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाला.

महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचा महापौर विराजमान झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आपल्या विश्वासातील आणि कर्तबगार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती फडणवीस यांना करायची होती. त्यानुसार भिडेची नियुक्ती होणार आहे.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे या १९९५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. यासह त्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या या कामकाजाची दखल घेत त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT