BMC to launch a housing lottery for 426 affordable homes in Mumbai after Diwali, following MHADA’s model; applications to open next week. Saam tv
मुंबई/पुणे

BMC Lottery : म्हाडापाठोपाठ BMC काढणार घरांची लॉटरी? घरांच्या बांधणीत BMC ची उडी?

BMC Lottery For Houses: आता सर्वसामान्यांना मुंबई शहरातच घर घेणं सोपं होणार आहे.. कारण आता म्हाडा, सिडको प्रमाणेच मुंबई महापालिकाही घरांसाठी लॉटरी काढणार आहे. मात्र ही लॉटरी कधी काढली जाणार आणि किती घरांसाठी असणार आहे? पाहूयात.

Bharat Mohalkar

  • पुढच्या आठवड्यापासून घरांसाठी अर्ज स्वीकारायला सुरुवात

  • मुंबई महापालिका 300 कोटींपेक्षा जास्तीचा महसूल उभा करणार

  • मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर जाहिरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

म्हाडा सिडको प्रमाणे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या सोडतीसाठी मुंबई महापालिकाही मैदानात उतरलीय. मुंबई महापालिका 426 घरांची दिवाळीनंतर लॉटरी काढून विक्री करणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका पुढच्या आठवड्यापासून घरांसाठी अर्ज स्वीकारायला सुरुवात करणार आहे. तर या घरांच्या विक्रीतून मुंबई महापालिका 300 कोटींपेक्षा जास्तीचा महसूल उभा करणार आहे. मात्र मुंबई महापालिका घरांच्या विक्रीत का उतरलीय? पाहूयात.

विकास नियंत्रण नियमावलीतील बदलानंतर 4 हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भुखंडावर बांधकाम केल्यानंतर 20 टक्के घरं महापालिकेला बांधून देण्याची जबाबदारी विकासकाला बंधनकारक असणार आहे. या घरांचा आकार 270 आणि 528 स्क्वेअर फूट आहे. तर त्याची किंमत 60 लाख ते 1 कोटींच्या दरम्यान असणार आहे. ही घरं अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना विकण्यात येणार आहेत.

या घरांसाठी मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर जाहिरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र ही घरं मुंबईतील कोणत्या भागात असणार आहेत? पाहूयात. 426 घरांपैकी जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम, दहिसर पश्चिम, भायखळा पश्चिम, कांदिवली पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व, भांडूप पश्चिम, कांजुरमार्ग या ठिकाणी ही घरं असणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या लॉटरीमधील 426 घरांपैकी भायखळा भागातील घरांच्या किंमती जास्त असणार आहेत. तर उपनगरातील घरांच्या किंमती तुलनेनं कमी असणार आहेत. त्यामुळं म्हाडा, सिडको यानंतर यापुढे मुंबई महापालिकेच्या घरांच्याही ल़ॉटरीने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT