Maharashtra Monsoon Update: राज्यात मान्सून सर्वत्र दाखल झाला आहे. काल पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसाने आणि नाले सफाई व्यवस्थित न झाल्याने मुंबईला पहिल्याच पावसात नदीचं स्वरुप प्राप्त झालं. सध्या मुंबईला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र तरी देखील मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. (Latest Monsoon Update News)
एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल एकाच दिवसात एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (Mumbai) शहरात १०४ मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात गेल्या २४ तासांत अनुक्रमे १२३ मिमी आणि १३९ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने याची माहिती दिली आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबईला २५ ते २८ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये २५ ते २८ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलाय. नंदुरबार आणि डहाणू या शहरांमध्ये तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. येथे पुढचे ५ दिवस ग्रीन अलर्ट जारी केलाय.
राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनने (Mansoon) आता महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, छत्तीसगढ येथे आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. mega
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.