मुंबई/पुणे

Mill Worker: मुंबईचे गिरणी कामगार शेलू गावात विसावणार; 30 हजार जणांना मिळणार घरं

Mill Worker House: मुंबईतील गिरणी कामगारांना आता त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. शेलू गावात गिरणी कामगारांना घरे दिली जाणार आहेत.

Mayuresh Kadav

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागला असून ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या शेलू गावाच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी भव्य संकुल उभारण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

1982 मधील तीव्र संपामुळे मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या. त्यामुळे गिरणी कामगारांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागला. महाराष्ट्र सरकारने या गिरणी कामगारांना अनुदानित घरे मिळवून देण्यासाठी खासगी विकासकांच्या भागीदारीत 'गिरणी कामगार घरकुल योजना' राबविली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने शेलू इथे जागा निश्चित केलीय. 

राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंच्युरी मिल कामगार एकता संघ या गिरणी कामगारांच्या प्रमुख संघटनांनी शेलू येथील 'कर्मयोगी एव्हीपी रियलिटी' यांच्या जागेची पाहणी करून या जागेस मान्यता दिलीय तसं पत्र म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागास दिलय. गिरणी कामगारांच्या घरांसाठीची जागा निश्चित झाली असून आता त्या ठिकाणी लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणारय. या गृह संकुलासाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देखील मंजूर करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टॅरिफनंतर भारताला आणखी एक धक्का, अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांवर थेट परिणाम

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

SCROLL FOR NEXT