Mhada Lottery  Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery: म्हाडा मुंबईकरांसाठी काढणार ६००घरांची लॉटरी? कधी निघणार सोडत?

Bharat Jadhav

(संजय गडदे)

Mumbai Mhada Lottery For 600 Houses:

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची वाट पाहणाऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळ नवीन वर्षात ६०० घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. (Latest News)

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई मंडळाने काढलेल्या लॉटरीतून शिल्लक राहिलेल्या ६०० घरांचा या नवीन लॉटरीमध्ये समावेश होणार आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये निघणाऱ्या या नव्या लॉटरीत आणखी काही घरांचा त्यात समावेश करता येतील का याबाबत देखील मुंबई मंडळाकडून चाचपणी सुरू करण्यात आलीय. दरम्यान ऑगस्ट महिन्यात म्हाडाने मुंबईतील ४,०८२ घरांसाठी सोडत काढली होती. यासाठी १ लाख २२ हजार अर्जदरांनी घरासाठी अर्ज केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असे मिळाले होते अर्ज

मुंबई मंडळ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) भागासाठी १,९४७ घरांचा यात समावेश होता. पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी २२,४७२ अर्ज आले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटामधळी ८४३ घरांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले होते.

म्हाडाचं रजिस्ट्रेशन पहिल्यांदाच करत असाल तर

  • या घरासाठी अर्ज करायचा असेल तर mhada.gov.in MHADA हाउसिंग लॉटरी या वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.

  • रजिस्ट्रेशन पर्याय निवडा.

  • तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची सगळी माहिती भरावी लागेल.

  • आधार कार्ड नंबर आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबरदेखील द्या लागेल.

  • त्यानंतर तुमच्या कामाचे संपूर्ण माहिती उदा पगार किंवा व्यावसायिक असाल तर त्याची माहिती द्या.

  • तुम्ही जर कोट्यातून घर घेणार असाल तर त्याची माहिती आणि सोबत कागदपत्र जमा करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT