Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?

Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेगाने सुरू आहे. सध्या या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू असून हा मार्ग लकवरच प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहेत. हा मेट्रो प्रवास कसा असणार आहे याबद्दल घ्या जाणून...

Priya More

धारावी ते वरळी येथील आचार्य अत्रे चौक यांना जोडणाऱ्या भुयारी मुंबई मेट्रो लाईन -३ चा बहुप्रतिक्षित दुसरा टप्पा आता व्यावसायिकरित्या लवकरच सुरू होणार आहे. ६ स्थानकांसह हा नवीन मार्ग ९.७७ किलो मीटर अंतराचा आहे. या मार्गावर नियमित चाचणी सुरू आहेत. सध्या आरे ते बीकेसी पर्यंतच्या भुयारी मेट्रो लाईन -३ चा ११ किलो मीटरपेक्षा जास्त भाग कार्यरत आहे.

मेट्रो लाईन - ३ चा पहिला टप्पा ज्याला अ‍ॅक्वा लाईन देखील म्हणतात. गेल्या वर्षी हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत आला. ज्यामुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि आरे जेव्हीएलआर दरम्यान प्रवाशांना एक नवीन भुयारी मार्गातून प्रवास करण्याचा अनुभव मिळत आहे. या भुयारी मेट्रो मार्गाला प्रवाशंकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेगाने सुरू आहे. सध्या या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू असून हा मार्ग लकवरच प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहेत. या भुयारी मेट्रो मार्गाचा मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहत हे आपण जाणून घेणार आहोत...

मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्याचे फायदे -

– मुंबईतील रहिवाशांसाठी सुधारित कनेक्टिव्हिटी होईल. महत्त्वाच्या क्षेत्रांमधील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ देखील कमी करणे.

- शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आधार देणारी सुधारित वाहतूक पायाभूत सुविधा.

- रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी होईल.

मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्यावर स्थानके किती?

धारावी ते वरळी मेट्रो लाईन- ३ या मार्गावर सहा नवीन स्थानके असतील. यामध्ये धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही मेट्रो स्थानके असतील.

मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये -

- हा विस्तारित मार्ग ९.७७ किमी पर्यंतचा असणार आहे.

- हा नवा मेट्रो मार्ग धारावी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकाला जोडणार आहे.

- भुयारी मेट्रोचा सध्या आरे ते बीकेसीपर्यंत ११ किमीचा मार्ग सध्या कार्यरत आहे.

तिकीट आणि प्रवासाचा कालावधी किती?

धारावी ते वरळी मेट्रो लाईन- ३ हा प्रवास २२ किलो मीटरचा असून या प्रवासाला ३६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना ६० रुपये मोजावे लागणार आहे.

मेट्रो लाईन- ३ च्या दुसऱ्या टप्प्यातील आव्हाने -

धारावी ते आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रो मार्गावर एक भाग मिठी नदीखालील जुळ्या बोगद्यातून जातो. ज्यासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) सारख्या प्रगत बोगद्याच्या तंत्रांची आवश्यकता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT