Kanjurmarg Metro Carshed Saam TV
मुंबई/पुणे

Kanjurmarg Metro Carshed : ठरलं! मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्येच होणार, सरकारकडून कामाला वेग

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबई मेट्रो कारशेडसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या वादानंतर राज्य सरकारने मेट्रो ६ साठी कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. MMRDA ने यासाठी ५०६ कोटींची निविदा (Tender) काढली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने ज्यावेळी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ही जागा नेमकी राज्य सरकारची की केंद्र सरकारची यावरुन मोठा वाद झाला होता.

मात्र आता कांजूरमार्ग कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीएने स्टॅबलिंग यार्ड, डेपो कंट्रोल सेंटर, कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, मेंटेनन्स आणि वर्कशॉप बिल्डिंग आणि सबस्टेशनच्या उभारणीसाठी निविदा काढली आहे. (Latest Marathi News)

वाद काय होता?

२०१९ मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नागरिक आणि पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम थांबवले होते. त्याऐवजी, ठाकरे सरकारने यांनी कांजूरमध्ये मेट्रो कारशेडसाठीची जागा निश्चित केली होती.

मात्र ही जागा मीठागराची असून केंद्र सरकारने या जागेवर हक्क सांगितल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र ही जागा राज्य सरकारचीच असल्याचं सरकारने यावर्षी अधिवेशनात स्पष्ट केले. त्यानंतर या जागेवर मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. (Mumbai News)

कसा आहे मेट्रो ६ मार्ग?

मेट्रो ६ एकूण १४.४७७ किलोमीटरची एलिव्हेटेड लाईन आहे. मेट्रो ६ मुळे लोखंडवाला कॉम्प्लेक्स जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमार्गे विक्रोळीशी जोडले जाणार आहे. या मार्गावर एकूण १३ स्थानके असतील. यामुळे पश्चिम रेल्वे (जोगेश्वरी) आणि मध्य रेल्वेशी (कांजूरमार्ग) जोडले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT