AC Electric Best Bus  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai AC Bus Service: खुशखबर! उन्हाळ्यात प्रवासाचं नो टेन्शन; खास मेट्रो प्रवाशांसाठी बेस्टमार्फत एसी बस सेवा सुरू

AC Bus Services for Metro Train Passengers: उन्हाच्या तडाख्यात अशा प्रकारे एसी बसने प्रवास मिळणार असल्याने नागरिक सुखावले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Metro AC Bus Service : मुंबई मेट्रो संचलन मंडळाच्या समन्वयाने बेस्टमार्फत गुंदवली मेट्रो स्थानक ते बिकेसी अशी प्रीमियम एसी बस सेवा सुरू केली आहे, त्यामुळे मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. बेस्ट ची बस क्र. एस - ११२ ही बस प्रवाशांना गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी आणि बिकेसी ते गुंदवली या मार्गावर चालवली जात असून दरम्यान एकूण २१ थांबे आहेत. उन्हाच्या तडाख्यात अशा प्रकारे एसी बसने प्रवास मिळणार असल्याने नागरिक सुखावले आहेत. (Ac Bus)

गुंदवली ते बीकेसी या मार्गावर सकाळी ०७:३० वाजल्यापासून ११:४० वाजेपर्यंत १६ फेऱ्या, तर बीकेसी ते गुंदवली या मार्गावर दुपारी ३:४० वाजल्यापासून पासून रात्री ८:१५ वाजेपर्यंत १३ अशा एकूण २९ फेऱ्या चालवत आहे. गुंदवली ते बीकेसी या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गंतव्य स्थानकापर्यंत सुमारे रू.६० ते रू.९० इतके भाडे आकारले जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना (चलो) या बेस्ट बस ॲपचा वापर करून तिकीट बुक करावे लागेल.

“गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधेसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो (Metro) स्थानकांजवळील पार्किंगची जागा उपलब्ध करुण देणं असो की इलेक्ट्रिक बाइक्स उपलब्ध करून देणं, मुंबईकरांना मेट्रोनं प्रवास करताना त्यांच्या प्रवासातील अडथळे कसे पार होतील यावर आम्ही भर देत आहोत, असं एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले.

तसेत मुंबईकरांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी आम्ही इतर संस्थांसोबत समन्वय निर्माण करण्याची आणि एक मजबूत कार्यप्रणाली तयार करण्याची योजना आखत आहोत.” असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT