Mumbai Metro News :  
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा, 7 A वर टनेलद्वारे बोगद्याचे काम, मुख्यंत्र्यांकडून अचानक पाहणी

Mumbai Metro News : मुंबई मेट्रो ७ अ साठी अंधेरी (पूर्व) ते CSMIA दरम्यान 1.647 किमी लांबीचा भुयारी बोगदा पूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली; मेट्रोचे काम वेगाने सुरू.

Namdeo Kumbhar

Mumbai Metro 7 A : मुंबईच्या विस्तारत्या मेट्रो जाळ्यासाठी आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई मेट्रो ७ अ मार्गिकेसाठी बोगदा तयार करण्यात येत आहे. ‘ब्रेकथ्रू’मुळे अंधेरी (पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) दरम्यान १.६४७ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला. सध्या टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगद्याचे का प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ अ ब्रेक थ्रूचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी पाहणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विलेपार्ले, मुंबई येथे 'मुंबई मेट्रो मार्ग 7अ' वरील डाऊनलाईन टनल ब्रेकथ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकार्‍यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले TBM मशिन जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग 3 च्या वरुन सहार उन्नत रस्त्यांखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करुन TBM ने बोगद्याचा ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केला. मेट्रो मार्ग 7अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील. याप्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मेट्रो ७ अ ब्रेक थ्रूचे काम पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबई मेट्रोचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या मेट्रोचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.७ अ या मार्गिकेतील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वास आला आहे. पुढील वर्षांपर्यंत १५० किमी पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करणार आहे. मुंबई मेट्रोचे काम मार्व्हल इजिनिअरिंग यांनी केलेय.

६.३५ मीटर व्यासाचा ७ अ वरील हा मेट्रो मार्ग मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बांधलेला मेट्रो जाळ्यातील पहिला भुयारी मार्ग ठरला आहे. विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ७ अ वरील बोगद्याचे खोदकाम सुरू आहे. गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोच्या मार्गावर बोगदे करण्यात येत आहेत. बोगद्याचा ब्रेक थ्रू दिशा या कंपनीच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे करण्यात येत आहे.

भुयारी मार्ग पूर्ण झाल्याने CSMIA ला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रो लाइन 7A मुंबईच्या शहरी गतिशीलतेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या मार्गावरील पुढील कामे, जसे की स्थानकांचे बांधकाम आणि यंत्रणांचे एकीकरण, वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असल्याचे एमएमआरडीच्या अदिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT