Mumbai Metro SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai Metro 3 गेम चेंजर ठरणार, कुणाला होणार सर्वाधिक फायदा, वाचा सविस्तर

Mumbai Metro 3 full route map : मुंबई मेट्रो ३ गुरुवारपासून सुरू होणार आहे. हा मार्ग कफ परेड ते आरेपर्यंत जाणार आहे. या अ‍ॅक्वा लाईनमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि दक्षिण ते उत्तर मुंबई प्रवास सुलभ होणार आहे. जाणून घ्या मेट्रो ३ ची वैशिष्ट्ये, मार्ग आणि फायदे

Namdeo Kumbhar

Mumbai Metro 3 Underground Route Travel Time Ticket : मुंबई शहरातील वाढत्या गर्दीवर उतरा काढण्यासाठी मेट्रोची संख्या वाढवली जातेय. गेल्या काही दिवसांत मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. गुरूवारपासून मेट्रो ३ मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. दक्षिण मुंबई, बीकेसी, वरळी, आरे, धारावी आणि इतर भागातील मुंबईकरांसाठी मेट्रो गेम चेंजर ठरणार आहे. मेट्रो ३ सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार आहेच, त्याशिवाय वाहतूक कोंडीपासून सुटकाही मिळणार आहे.

मुंबई मेट्रो- ३ ला अ‍ॅक्वा लाईन (Aqua Line) म्हणूनही ओळखले जाते. ही मेट्रो पूर्णपणे भूमिगत असून गुरूवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. कफ परेड ते सीप्झ/आरे पर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान होणार आहे. विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, CSMT, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह ११ भूमिगत स्टेशन प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत.

मुंबई मेट्रो-३ म्हणजे काय?

मुंबई मेट्रो लाईन ३ ही पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड ते उत्तरेकडील आरे या दोन भागांना ही मेट्रो जोडते. ३३.५ किमी भूमिगत मेट्रोमुळे वाहतूककोंडी कायमची संपणार आहे. बीकेसी, वरळी, चर्चगेट आणि काळबादेवी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसह २७ स्थानके आहेत. या मार्गावरून दररोज १७ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तवला जातेय. या मेट्रोमुळे मुंबईतील लोकल गर्दीला उतारा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो-३ ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? फायदा काय ?

मेट्रो-३मुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. आरे आणि कफ परेड दरम्यानचा प्रवासासाठी सध्या दोन तासाचा वेळ लागतो. हा प्रवास फक्त एक तासात होणार आहे.

प्रवासाचा वेळ तर वाचणार आहेच. त्याशिवाय तिकिटाच्या किंमतीही कमी असतील, असा अंदाज आहे. या मार्गावर तिकिटाचे दर १० ते ७० रूपये यादरम्यान असण्याची शक्यता आहे. दररोज प्रवास करणाऱ्यांना हा फायदेशीर मार्ग ठरू शकतो.

मेट्रोमुळे रस्त्यावरील गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. रस्त्यावरील गर्दी ३५% कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातेय.

मेट्रो-३ ही लाईन सध्या असणाऱ्या मेट्रो लाईनला जोडली जाणार आहे. त्याशिवाय भविष्यात येणाऱ्या मेट्रो मार्गालाही जोडला जाणार आहे. या मेट्रो लाईनमुळे संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढणर आहे.

मेट्रो- ३ चा फायदा कोणत्या भागाला होणार?

दक्षिण मुंबई अन् उत्तर मुंबई या मेट्रो मार्गामुळे जोडली जाणार आहे.

कफ परेड, चर्चगेट, काळबादेवी या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. त्यामुळे वेळ वाचेल.

बीकेसी आणि वरळी हे दोन प्रमुख भाग जोडले जातील. या भागात कनेक्टिव्हिटी सुधारेल. आरे आणि सीप्झ या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांना फायदा होणार आहे.

धारावी आणि सीतालादेवी या दाट लोकवस्तीच्या भागात प्रवासासाठी आणखी एक पर्याय मिळणार आहे.

मेट्रो-३ कोणत्या मेट्रो मार्गासोबत जोडणार?

मेट्रो ३ हा मार्ग सध्या सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गाला आणि भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन्सला जोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. मेट्रो-३ कोणकोणत्या मेट्रो मार्गासोबत जोडणार, ते पाहूयात..

मरोळ नाका - लाईन 1 (ब्लू लाईन).

आरे जेव्हीएलआर - लाईन ६ (गुलाबी लाईन)

सीएसएमटी - लाईन ७अ (रेड लाईन) आणि लाईन ८ (गोल्ड लाईन)

बीकेसी - लाईन २बी (यलो लाईन)

दादर, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्चगेट - वेस्टर्न लाईन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips: Eyebrowचे केस अचानक गळतायेत अन् बारिक दिसतायेत? मग या टिप्स नका करा फॉलो

Nutrition Tips: डोक्यात वाईट विचार का येतात? या' व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आरोग्यावर होतो परिणाम

Jay Bhanushali-Mahhi Vij : घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने मौन सोडलं, VIDEO शेअर करून सर्व सांगितलं

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

SCROLL FOR NEXT