Crime : वाशी स्थानकावर महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग, नको त्या ठिकाणी हात लावला अन्....

Police arrest accused in Vashi molestation case after CCTV check : वाशी स्थानकावर कॉलेज मुलीचा दिवसाढवळ्या विनयभंग झाल्याची घटना घडली. पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai
College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai
Published On

College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai : गजबजलेल्या वाशी स्थानकावर महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजनंतर घराकडे निघालेल्या मुलीच्या अंगावर हात लावून लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तात्काळ आरडाओरड केला अन् प्लॅटफॉर्मवर असलेल्या महिला पोलिसांना बोलवलं. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

वाशी रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवर १९ वर्षीय महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना शनिवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा शोध घेत मुसक्या आवळल्या. आरोपीला कोर्टात हजर केले असून सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिवसाढवळ्या विनयभंगाच्या घटनेने महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai
Maharashtra Election : अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान

वाशी जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी माहिती दिली की, तक्रारदार सकाळी ११.४० वाजता कॉलेजमधून घरी परतत असताना ही भयानक घटना घडली. आरोपी मुलीच्या शेजारी प्लॅटफॉर्मवर येऊन उभा राहिला. ती कॉलवर बोलत असताना, आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. पीडितेने ताबडतोब महिला जीआरपी कर्मचाऱ्याला माहिती दिली. दरम्यान, आरोपी पळून गेला होता. आरोपीचा फोटो रेल्वे स्टेशनवीरल सीसीटीव्हीवरून मिळाला. त्यानंतर माहिती मिळवत सापळा रचला. आरोपी मुलाला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai
गंभीरच! सरन्यायाधीश गवई यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न, भगवान विष्णुंवरील व्यक्तव्याने राडा

वाशीसारख्या गर्दीच्या स्थानकात दिवसाढवळ्या विनयभंगाच्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. रेल्वे स्टेशनसारख्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे नवी मुंबई हादरली आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा विनयभंग झाल्याच्या घटनेने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

College girl molested at Vashi railway station in Navi Mumbai
पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com