Science Centre Metro Station Photo Saam
मुंबई/पुणे

Metro 3 बाबत महत्त्वाची अपडेट! वरळी ते कफ परेडदरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार

Science Centre Metro Station Photo: मुंबई मेट्रो लाईन - ३ अखेर पूर्णत्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ८ ऑक्टोबरला उद्घाटन. विज्ञान केंद्र स्थानकाचे फोटो समोर.

Bhagyashree Kamble

  • मुंबई मेट्रो लाईन - ३चं काम पूर्ण.

  • पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करणार.

  • प्रवाशांच्या वेळेची बचत. स्थानकाचे फोटो समोर.

लोकलनंतर मुंबईत मेट्रोचं जाळं वेगानं पसरत चाललं आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन - ३, ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनबी ओळखले जाते, अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उद्घाटन झाल्यानंतर मेट्रो लाईन - ३ लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वरळी-कफ परेड या शेवटच्या टप्प्यातील मेट्रो लाईन - ३चं उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्यानंतर कुलाबा - वांद्रे सीप्झ असा तब्बल ३३.५ किमी लांबीचा कॉरिडॉर पूर्णत: कार्यान्वित होणार असून, दक्षिण मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडेल.

सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाचे फोटो समोर

उद्घाटन करण्यापूर्वी मुंबई मेट्रो ३ प्राधिकरणाने वरळी येथील सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाचे आतील फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे. आकर्षक डिझाईन, आधुनिक डिझाईन, इंटीरियर, हॉल आणि प्रवेश - निर्गमन व्यवस्था या फोटोंद्वारे दिसून येत आहे. मेट्रो लाईन - ३ नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू तारांगण, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा आणि फिनिक्स मॉल यांसारख्या महत्वाच्या स्थळांवर वेळेत पोहोचेल.

वरळी ते कफ परेड जोडणारा शेवटचा मेट्रो टप्पा सुरू झाल्यानंतर, अॅक्वा लाईन ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो ठरणार आहे. या मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि उपनगरांमधील प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होईल.

टप्प्याटप्प्यानं सुरूवात

  • आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आला.

  • बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मे २०२४ रोजी करण्यात आले.

  • लवकरच शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड मेट्रो लवकरच सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT