Mumbai metro line 1  meta ai
मुंबई/पुणे

Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो प्रवाशांना दिलासा! प्रवास गर्दीमुक्त होणार, ६ डब्यांची मेट्रो लवकरच धावणार

Mumbai Metro : प्रवाशांची वाढती गर्दी आणि गैरसोय पाहता लवकरच सहा डब्यांची मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी 22 डब्बे खरेदी करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

Saam Tv

मुंबईची पहिली मेट्रो सेवा असलेल्या घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, या मार्गावर आता चार डब्यांऐवजी सहा डब्यांची मेट्रो चालवण्याचा निर्णय मु्ंबई मेट्रो वन प्राइव्हेट लिमिटेडकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी 22 डबे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यास मदत होईल .

घाटकोपर ते वर्सोवा हा 11.4 किलोमीटरचा मार्ग मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर रोज साडेचार लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर, अंधेरी आणि वर्सोवा या मुख्य स्थानकांवर तुफान गर्दी पाहायला मिळते. चार डब्यांच्या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेकदा उभे राहणेही कठीण होते आणि स्थानकांवरही लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आणि वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी मेट्रो प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. सहा डब्यांची मेट्रो सुरू झाल्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार आहे. प्रत्येक फेरीत सुमारे 1792 प्रवासी प्रवास करु शकतील. यामुळे स्थानकांवरील गर्दीचा ताण कमी होईल आणि प्रवाशांना धक्काबुक्कीशिवाय प्रवास करता येईल.

सध्या या मार्गावर सहा डब्यांच्या मेट्रोच्या चाचण्या आणि तांत्रिक बाबी अंतिम टप्प्यात आहेत. सुरक्षेच्या सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर ही सेवा पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar Family: लाइमलाइटपासून दूर नाना पाटेकर यांचे कुटुंब; पत्नी आणि मुलगा काय करतात?

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी अमरावतीत इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Weight Loss : नवरात्रीत फिटनेसचा फंडा, वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ गरबा खेळावा?

Bribe Case : DGCA च्या २ बड्या अधिकाऱ्यांना २५०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, मुंबईत CBI ची मोठी कारवाई

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका, दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

SCROLL FOR NEXT