Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Ghatkopar To Varsova Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वच मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Priya More

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा उशिराने सुरू आहे. घाटकोपरपासून ते सर्वच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आधीच लोकलसेवा उशिराने सुरू आहे. त्यात आला मेट्रोसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला लेटमार्क लागणार असल्यामुळे मुंबईकर वैतागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐन गर्दीच्या वेळी घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घाटकोपरवरून वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो उशिराने धावत आहेत. त्यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. पाऊल ठेवायला जागा नाही इतकी गर्दी झाली आहे. मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवासी पर्यायी मार्गाने ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

घाटकोपर मेट्रो स्थानकात परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महिलांच्या आणि पुरुषांच्या अशा वेगवेगळ्या चार रांगा लागल्या आहेत. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने मोठी गर्दी झाली आहे. घाटकोपर ते वर्सोवापर्यंत कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो धिम्या गतीने धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT