Mumbai Metro 4 Features  Saam tv
मुंबई/पुणे

Metro 4: 316 आसन क्षमता, 6 डबे; अशी असेल मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी मेट्रो, आंध्रप्रदेशच्या कारखान्यातून मेट्रो 4 चा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Metro 4 Features: मुंबई ते ठाणेदरम्यान लवकरच मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसाट होईल. ही मेट्रो कशी असणार आहे हे जाणून घ्या...

Priya More
  • मुंबई ते ठाणे दरम्यान लवकरच मेट्रो धावणार

  • मुंबई मेट्रो 4 मध्ये ६ डबे आणि ३१६ आसन क्षमता

  • आंध्र प्रदेशातील श्री सिटीमध्ये तयार होतेय मुंबई मेट्रो 4

  • मेट्रो ४ मध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबा आणि सीसीटीव्ही सुविधा

गिरीश निकम, विशेष प्रतिनिधी, साम टीव्ही

मुंबईची वाहतूक क्षमता आणखी सक्षम करणारी मेट्रो लाईन- 4 ची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ठाण्यातील गायमुख ते मुंबईतील वडाळामधील भक्ती पार्क असा एकूण 35 किमीचा मार्ग असणार आहे. मेट्रो लाईन 4 A अंतर्गत कासारवडवली ते गायमुख असा 2.7 किमीचा विस्तार जोडण्यात आला आहे. हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) आणि एलबीएस मार्गावरून (LBS Marg) जातो. ठाणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या या मार्गावर 316 आसन क्षमता असणारी 6 डब्यांची मेट्रो धावणार आहे.

कुठे तयार होते मेट्रो 4?

मेट्रो लाईन 4 A ही मेट्रो कुठे बनते आहे माहिती आहे का? आंध्र प्रदेशमधील श्री सिटी या विशेष औद्योगिक क्षेत्रात अल्स्टॉम कंपनीच्या कारखान्यात मेट्रोचे कोच बनवले जात आहेत. साम टीव्हीचे विशेष प्रतिनिधी गिरीश निकम यांनी थेट या कारखान्यात जाऊन मेट्रोच्या बांधणीचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेतला आहे. ही मेट्रो कशी असणार आहे याचे वैशिट्ये काय असणार आहे, मेट्रोमध्ये प्रवाशांना काय सुविधा मिळणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

अल्स्टॉम ही प्रसिद्ध बहुराष्ट्रीय फ्रेंच कंपनी आहे. सेंट-ओएन (पॅरिसजवळ) येथे मुख्यालय असलेली ही कंपनी जगभरात हाय-स्पीड ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, ट्राम, रेल्वे सिग्नलिंग आणि डिजिटल वाहतूक प्रणालींची उभारणी आणि देखभाल करण्यासाठी ओळखली जाते. अल्स्टॉम आणि एल अँण्ड टी (लार्सन अँण्ड टुब्रो) या दोन विख्यात कंपन्या MMRDA साठी मेट्रो 4 ची निर्मिती करत आहेत. ठाणे ते मुंबई दरम्यान 6 डब्यांच्या एकूण 39 गाड्या धावणार आहेत. म्हणजेच सुमारे 2200 प्रवाशांना सहज आणि आरामात प्रवास करता येणार आहे.

मेट्रो 4 ची वैशिष्ट्ये -

ठाणे- मुंबई दरम्यान 32 स्टेशन असणार आहे. हा मार्ग 35 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर 6 डब्यांची एक मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये 316 आसन क्षमता असणार आहे. या मार्गावर एकूण 39 गाड्या धावणार आहेत. या मेट्रोसाठी चालकविरहीत प्रणाली असणार आहे. महत्वाचे म्हणजे या मेट्रोत महिलांसाठी विशेष डबा असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग व्यक्तींसाठी या मेट्रोमध्ये

राखीव आसन व्यवस्था असणार आहे. यामध्ये 6 सायकल स्टॅण्ड देखील असणार आहे. प्रवासा दरम्यान 36 सीसीटीव्ही कॅमेरांचं प्रवाशांवर लक्ष असणार आहे. 24 प्रवासी आपत्कालीन अलार्म मेट्रोमध्ये असणार आहेत. ट्रेन ऑपरेटर, ऑपरेशन कंट्रोल सेंटरशी हे अलार्म जोडलेले असतील. प्रगत अग्निसुरक्षा नेटवर्क देखील मेट्रोल बसवले जाणार आहे. बाहेरील धूर संरक्षण प्रणाली देण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये तापमान नियंत्रण यंत्रणा देखील असेल.

मुंबईत सध्या चार पूर्णपणे कार्यरत आणि दोन अंशतः कार्यरत अशा एकूण सहा मेट्रो मार्गिका आहेत. मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये सध्या एकूण 77 स्थानके कार्यरत आहेत. मेट्रो 4 कॉरिडॉरचा उद्देश हा प्रमुख व्यावसायिक केंद्रे, शासकीय आस्थापने, निवासी क्षेत्रे आणि रोजगार केंद्रांपर्यंतची कनेक्टिव्हीटी सुधारणे, तसेच संबंधित मार्गांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे हा आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे जाळे मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. 25 केव्ही एसी ओव्हरहेड वीज पुरवठ्यावर चालणारी, तसेच प्रत्येक वेळी ट्रेनचा वेग कमी झाल्यावर वीज वाचवणारी ऊर्जा-कार्यक्षम रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा यात आहे.

मेट्रो लाईन 4 ची निर्मिती कोण करणार?

सुरुवातीला सहा डब्यांची मेट्रो असणार आहे. या नवीन ताफ्यात एक मॉड्यूलर डिझाइन आहे ज्यामुळे प्रवाशांची मागणी वाढल्यास आठ डब्यांच्या सेवेपर्यंत विस्तार करता येईल, अशी माहिती एल अँण्ड टीचे जनरल मॅनेजर आशीष गुप्ता यांनी दिली. मुंबई मेट्रो लाईन 4 आणि 4 A (ग्रीन लाईन) च्या निर्मितीमध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक भूमिका बजावत आहे. एमएमआरडीए (MMRDA) कडून एल अँड टी कंपनीला या प्रकल्पाशी संबंधित तीन मोठी कंत्राटे मिळाली आहेत, ज्यांतर्गत कंपनी खालील कामे करणार आहे. याअंतर्गत मेट्रो ट्रेन (रोलिंग स्टॉक) आणि सिग्नलिंग यंत्रणा पुरवणे, वीजपुरवठा आणि विद्युतीकरण, ट्रॅक वर्क - रेल्वे रुळ बसवणे, देखभाल आणि दुरुस्ती यांचा समावेश आहे.

थोडक्यात सांगायचे तर, मुंबई मेट्रो 4 च्या निर्मितीमध्ये स्थापत्य कामांनंतर (Civil Works) मेट्रो चालवण्यासाठी लागणारे रुळ, सिग्नल यंत्रणा, वीज पुरवठा, लिफ्ट-एस्केलेटर आणि स्वतः ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन पुरवण्याचे मुख्य काम एल अँड टी करत आहे. अल्स्टॉम आणि एल अँड टी या दोन्ही कंपन्यांच्या कुशल अभियंत्यांनी मेट्रोची निर्मिती केली आहे. मुंबईतील हवामान, जास्त पाऊस या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या मेट्रो कोचमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती अल्स्टॉम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चंपक पांडा यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली.

कधी येणार मुंबईकरांच्या सेवेत?

यापूर्वी अल्स्टॉम कंपनीने चेन्नई मेट्रो, दिल्ली मेट्रो, पुणे मेट्रो, भोपाळ आणि इंदूर मेट्रो, आग्रा आणि कानपूर मेट्रो, कोची आणि लखनौ मेट्रो यांच्यासाठी आधुनिक कोच, सिग्नलिंग आणि मेंटेनन्स सोल्यूशन्स पुरवले आहेत. या सर्व मेट्रो ट्रेन्स प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील श्री सिटी (Sri City) येथील अल्स्टॉमच्या अत्याधुनिक कारखान्यात तयार केल्या जातात. तर त्यांचे डिझाईन बंगळुरू येथील अभियांत्रिकी केंद्रात केले जाते. श्री सिटीमधील कारखान्यात मुंबई मेट्रो 4 च्या चाचण्या पूर्ण होत आल्या आहेत. आता अगदी काही महिन्यांची प्रतिक्षा आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी 2027 मध्ये या अत्याधुनिक मेट्रो 4 मधून तुम्ही प्रवास करु शकणार आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पंकजा मुंडेंचा रॅम्प वॉक! विरोधकांच्या टीकेला दिलं सडेतोड उत्तर

राष्ट्रवादीत पार्थवरून महाभारत? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? NCPच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Political News: मोठी बातमी! दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप, भाजप 'या' मोठ्या पक्षासोबत युती करणार

Fact Check: दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा होणार,RBIकडून लहान नोटांची छपाई कमी? काय आहे सत्य?

Maharashtra News Live Update : ऊस दरासाठी नागठाणे येथे 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको; पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT