Mumbai Local Mega Block on Central Line SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मध्य रेल्वेवर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; कधी, कुठे अन् कसा? वाचा सविस्तर

Vishal Gangurde

Mumbai Mega Block:

मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेच्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवार-रविवारी मध्यरात्री १.२० वाजल्यापासून ते ३.२० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याच्या कामासाठी लोकल सेवेच बदल करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, सीएसएमटी रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीकडे सुटणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ल्यापर्यंत धावणार आहे.

सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ही फक्त ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत चालविण्यात येईल. तर कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ही ठाण्याहून सुटेल. ही लोकल ट्रेन पहाटे ४.०४ वाजता सीएमसीएसटीसाठी सुटेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ब्लॉकआधी, सीएसएमटी येथून कर्जतसाठी सुटणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. खोपोली येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकआधी शेवटची लोकल, खोपोली येथून १०.१५ वाजता सुटेल.

सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतसाठी पहिली लोकल पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पहाटे ०३.४० वाजता सुटेल. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन सेवा रद्द राहतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT