Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवार यांचे महत्व तेव्हाही अन् आताही!; प्रफुल्ल पटेलांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on Sharad Pawar : मी शरद पवार यांना चांगलं ओळखतो. त्यांची पुरोगामी विचारधारा आहे. शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. ते कधीही भाजपसोबत जाणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
sanjay raut, praful patel and Sharad pawar Maharashtra Political News
sanjay raut, praful patel and Sharad pawar Maharashtra Political NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut Latest News :

शरद पवार यांचे महत्व तेव्हाही होते आणि आज देखील आहे, असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गौप्यस्फोटावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ( अजित पवार गट) विचारमंथन मेळावा कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) हल्लाबोल करताना मोठा गौप्यस्फोट केला होता. प्रमोद महाजन यांच्यामुळं सन २००४ मध्ये होणारी युती होता होता राहिली, असं पटेल म्हणाले होते. मी दिल्लीतील महाराष्ट्राचा निर्विवाद नेता आहे, शरद पवार सोबत आले तर आमचे दिल्लीतील नेते पवारांचे ऐकतील असे महाजन यांना त्यावेळी वाटले होते, असंही पटेल म्हणाले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत!

प्रफुल्ल पटेल यांच्या गौप्यस्फोटासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी रोखठोक उत्तरे दिली. पटेल, सुनील तटकरे काय बोलतात त्यावर मी काही बोलणार नाही. मी तेव्हाचं नाही, तर आजचं बोलत आहे. मी शरद पवार यांना चांगलं ओळखतो. त्यांची पुरोगामी विचारधारा आहे. शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. ते कधीही भाजपसोबत जाणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

sanjay raut, praful patel and Sharad pawar Maharashtra Political News
Ajit Pawar News: 'दिलेला शब्द पाळला पाहिजे...' अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

त्यावेळी त्यांच्यावर कुणी दबाव टाकला असेल...

संजय राऊत म्हणाले की, 'शरद पवार यांच्यावर त्यावेळी कुणी दबाव टाकला असावा. पण ते गेले का? २०१४ मध्ये त्यांनी समर्थन दिलं, पण सरकारमध्ये सहभागी झाले नाहीत. असे खेळ राजकारणात होत राहतात.'

शरद पवार हे इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ आहेत. ते मोदींच्या विरोधात उभे आहेत. दिल्लीच्या राजकारणात पवारांचे महत्व तेव्हाही होते आणि आज देखील आहे. गोपीनाथ मुंडे आमचे तेव्हाचे सहकारी असले तरी, त्यांच्यापेक्षा महत्व शरद पवारांचे जास्त होते. प्रमोद महाजन धूमकेतूप्रमाणे आले आणि निघून गेले. ते महत्वाचे नेते होते, मात्र शरद पवारांचे महत्व कायम राहील, असेही राऊत म्हणाले.

sanjay raut, praful patel and Sharad pawar Maharashtra Political News
Ajit Pawar Speech in NCP Melava In Karjat : बारामतीत लढणार; अजित पवारांनीच केलं जाहीर, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना थेट आव्हान

शरद पवार इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते

शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. राजकारणात काल काय घडले यापेक्षा आज आणि उद्या काय घडेल ते महत्वाचे आहे. शरद पवारांची मेहनत आणि मार्गदर्शन मोलाचे आहे, असेही राऊत यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com