MUMBAI MAYOR RITU TAWDE'S CONVOY MEETS WITH ACCIDENT ON SION FLYOVER; THREE VEHICLES COLLIDE saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Mayor Accident: मुंबई महापौरांच्या गाडीला अपघात; धडाधड तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

Mumbai Mayor Ritu Tawde Convoy Accident: मुंबई महापौर ऋतु तावडे यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. सायन पूलावर एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला.

Bharat Jadhav

  • मुंबई महापौर ऋतु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात झाला.

  • दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या.

  • महापौर आणि ताफ्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत महापौर रितु तावडे किंवा इतर कर्मचारी जखमी झालेले नाहीत. मात्र, या अपघातात महापौरांच्या गाडीचे आणि ताफ्यातील सुरक्षा वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर रितु तावडे या सोमवारी दुपारी एका नियोजित कार्यक्रमासाठी आपल्या ताफ्यासह जात होत्या. सायन पुलावरून जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ताफ्यातील सर्वात पुढे असलेल्या एस्कॉर्ट गाडीच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला.

एस्कॉर्टची गाडी अचानक थांबल्याने, त्यामागे असलेली महापौरांची मुख्य गाडी पुढच्या गाडीला जाऊन धडकली. नेटवर्क १८ वृतसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार महापौरांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या एस्कॉर्ट गाडीची समोरच्या वाहनाला धडक बसली. परंतु महापौर यांना कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नाहीये.

ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

एकापाठोपाठ एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने पुलावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, गाड्यांचा वेग मर्यादित असल्याने महापौरांना कोणतीही दुखापत झाली नाही. ताफ्यातील सुरक्षा रक्षक आणि चालकही सुखरूप आहेत. मात्र, गाड्या एकमेकांवर आदळल्याने त्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायन पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर महापौरांचा प्रवास थांबू नये यासाठी तातडीने पालिकेच्या ताफ्यातील दुसरे पर्यायी वाहन मागवण्यात आले. खराब झालेली वाहने बाजूला करून महापौरांना नवीन वाहने देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainy Season : पाऊस सुरू होताच लाईट का जाते? कारण काय तुम्हाला माहितीये?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला?

Maharashtra News Live Update: पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

Shocking : भयंकर! पत्नीने पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, रूमचा दरवाजा बंद केला अन्...

महिनाभर भात खाणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT