Narhari Zirwal Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Mumbai Mantralay Officer News : अन्न व औषध प्रशासनातील लिपिकाविरुद्ध लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली असून चौकशी समिती स्थापन झाली आहे. अहवाल येईपर्यंत प्रशासकीय बदल करण्यात आले असून पुढील कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • मंत्रालयातील लिपिकाविरुद्ध लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

  • मंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त

  • चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये बदल

  • अहवालानंतर पुढील कठोर कारवाईची शक्यता

संजय गडदे, मुंबई

Maharashtra Mumbai Mantraalay Clerk Corruption News अन्न व औषध प्रशासन मंत्रालयीन कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिक-टंकलेखक राजू संपत ढेरिंगे यांच्याविरुद्ध, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून मंत्रालयीन स्तरावर हालचालींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यावर नियमभंग व भ्रष्टाचाराशी संबंधित बाबींमुळे ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी अहवाल सादर होईपर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही प्रशासकीय निर्णय घेण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, चौकशी समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत डॉ. रामदास गाडे हे खाजगी सचिव पदाचा कार्यभार पाहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मंत्रालयीन वर्तुळात चर्चांना उधाण आले असून प्रशासनाने पारदर्शकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून चौकशी अहवालानंतर पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रालयाने भ्रष्टाचाराच्या बाबतीत शून्य सहनशीलतेची भूमिका कायम ठेवली असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT