Man Jumps Off Bandra Worli Sea Link SAAM TV
मुंबई/पुणे

Man Jumps Off Bandra Worli Sea Link : भल्या पहाटे तो कारमधून वांद्रे-वरळी सी लिंकवर उतरला; समुद्रात मारली उडी

Mumbai Bandra Worli Sea Link News : एक व्यक्ती कारमधून सी लिंकवर उतरली आणि थेट समुद्रात उडी घेतली.

Nandkumar Joshi

Mumbai Bandra Worli Sea Link News :

मुंबईत भल्या पहाटे धक्कादायक घटना घडली. वांद्रे-वरळी सी लिंकवरून आज पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली. ही व्यक्ती कारमधून सी लिंकवर उतरली आणि थेट समुद्रात उडी घेतली. या घटनेनंतर त्याचा शोध घेतला जात आहे. (Mumbai News)

मागील महिन्यात एका उद्योजकानं वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा एका व्यक्तीने सी लिंकवरून समुद्रात उडी मारली. गुरुवारी पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घटना घडली.

वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वांद्रे वरळी सी लिंकवर ही व्यक्ती कारमधून आली होती. त्याने सी लिंकवर एका बाजूला कार थांबवली. त्यातून तो उतरला आणि थेट समुद्रात उडी मारली. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि तटरक्षक दलाचे जवान या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सी लिंकवरून समुद्रात उडी मारणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? कुठून आली होती. या व्यक्तीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. कारच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती आहे. यापूर्वीही सी लिंकवर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

मागील महिन्यातच उद्योजकानं संपवलं होतं जीवन

मागील महिन्यातच खार येथील उद्योजकानं सी लिंकवरून समुद्रात उडी मारून आयुष्याचा शेवट केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता. ते काही दिवसांपासून नैराश्येत होते. मोबाइल फोन आणि पाकीट घरी ठेवून ते घराबाहेर पडले होते.

कारमधूनच ते वांद्रे-वरळी सी लिंकवर आले होते. त्यांनी समद्रात उडी मारून आत्महत्या केली. पोलीस आणि अग्निशमन दल आणि नौदलाकडून संपूर्ण दिवसभर त्यांचा शोध घेण्यात आला. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही त्यांचा शोध घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

SCROLL FOR NEXT