Hanging Garden  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईची ओळख असलेलं हँगिगं गार्डन ७ वर्षांसाठी बंद होणार? जवळपास ३५० झाडांना धोका?

Mumbai News : सर्व परवानग्या मिळाल्या तर हे काम येत्या नोव्हेंबर महिन्यात हे काम सुरु होऊ शकतं.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतलं हँगिंग गार्डन लहान मुलाचं प्रमुख आकर्षण. हँगिंग गार्डनसोबत आज अनेकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हातारीचा बुट तर आजही मुलांचं आवडीचं स्थळ आहे. मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांनी गजबजलेलं हेच हँगिंग गार्डन आता ७ वर्षांसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र पाणी साठवण्यासाठी जवळपास ९० दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. यातून दक्षिण मुंबईची तहान भागवली जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे काम काम केलं जाणार आहे.

सर्व परवानग्या मिळाल्या तर येत्या नोव्हेंबर महिन्यात हे काम सुरु होऊ शकतं. मात्र स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांना केली आहे. या जागेशी स्थानिक नागरिकांचा भावनिक नातं आहे. ते टिकून रहावं अशी भावना येथील नागरिकांची आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत म्हटलं की, या जलाशयासाठी दुसरी जागा शोधण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो आहे. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. यातून नक्कीच काहीतरी तोडगा निघेल. कोणताही निर्णय घेताना नागरिकांचा सहभागसुद्धा महत्त्वाचा ठरेल, असंही लोढा यांनी म्हटलंय. (Latest Marathi News)

NBT च्या वृत्तानुसार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितलं की, सात वर्षांच्या कालावधीत जलाशल पाडून तो पुन्हा बांधण्याची योजना आहे. या भागात सुमारे ३५० अशी झाडे आहेत, जी या कामादरम्यान कापली जाऊ शकतात किंवा पुनर्रोपण करावे लागणार आहे. यामध्ये आंबा, फणस, नारळ अशी अनेक झाडे आहेत.

हँगिंग गार्डन्स पाडून त्याखाली टाकी पुनर्बांधणीसाठी ६९८ कोटी रुपयांची योजना सुरू आहे. या जागेच २०१७ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलं होतं. तिथे असं दिसून आलं आहे की जलाशयाचे छप्पर ज्यावर बाग आहे, त्याचे खांब कमकुवत झाले होते. त्यामुळे हे काम लवकरच हाती घेतलं जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT