Malad News  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Mumbai Malad News : मालाड पूर्वमधील खाजगी शिकवणी वर्गात एका शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या तळहाताला मेणबत्तीने भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

मालाडच्या खाजगी शिकवणी वर्गात शिक्षिकेचा अमानुष वागणूक
८ वर्षीय विद्यार्थ्याच्या तळहाताला मेणबत्तीने दिला चटका
वडिलांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
शिक्षिकेविरोधात पोक्सो आणि इतर गुन्हे दाखल; तपास सुरू

मालाड पूर्वच्या फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरात एका खाजगी शिकवणी वर्गात एका शिक्षिकेने तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या तळहाताला जिवंत मेणबत्तीने जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २८ जुलै रोजी सायंकाळी जेपी डेक्स बिल्डिंगमध्ये घडली असून, संबंधित शिक्षिका राजश्री राठोड विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मोहम्मद हमजा खान हा लक्षधाम शाळेत तिसरीत शिकतो. संध्याकाळी त्याच्या बहिणीने हमजाला रोजप्रमाणे शिकवणीस सोडले. मात्र वर्गातून घरी परतताना हमजा जोरजोराने रडत होता आणि त्याच्या उजव्या तळहातावर भाजल्याचे स्पष्ट दिसत होते. बहिणीने विचारणा केल्यानंतर, राठोड यांनी त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि ही केवळ "नाटकबाजी" असल्याचा दावा केला.

मात्र घरी आल्यावर हमजाने वडिलांना सांगितले की, वाईट हस्ताक्षरामुळे शिक्षिकेने त्याचा हात थेट मेणबत्तीवर धरून शिक्षा दिली. संतप्त झालेल्या वडिलांनी शिक्षकाला जाब विचारल्यावर तिने दोष मान्य केला आणि अशा प्रकारची शिक्षा "शिस्त लावण्यासाठी" आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि राठोड यांनी वडिलांना शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला.

हमजावर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुलाच्या वडिलांनी कुरार गाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पोक्सो कायदा आणि बालकांवरील क्रूरतेशी संबंधित कलमांतर्गत राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. शिक्षण देण्याच्या नावाखाली अशा प्रकारे बालकांवर शारीरिक हिंसा केल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक विकास गंभीरपणे बाधित होऊ शकतो. संबंधित यंत्रणांनी अशा प्रकारच्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT