Malad Society Accident Saam
मुंबई/पुणे

पार्किंगमधून कार काढली, पण अनियंत्रित झाली, चाकाखाली चिमुरडा आला अन्...; थरारक VIDEO व्हायरल

Malad Society Accident: मालाडमधील इंटरफेस हाइट्स सोसायटीत एका सात वर्षांच्या मुलावर कार चढल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

Bhagyashree Kamble

  • मालाडमधून धक्कादायक बातमी समोर.

  • सोसायटीच्या परिसरात सात वर्षांचा मुलगा कारखाली चिरडला.

  • गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू.

संजय गडदे, साम टिव्ही

मालाडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंटरफेस हाइट्स सोसायटीत खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलाला कारच्या धडकेत गंभीर दुखापत झाली. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून, संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

मालाडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंटरफेस हाइट्स सोसायटीत खेळत असताना सात वर्षांच्या मुलाला कारने धडक दिली. कारच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत आवारात खेळत होता. श्वेता राठोड यांनी आपली कार बाहेर काढली. मात्र, कारने वळण घेताना त्यांचे नियंत्रण सुटले. कारचे चाक थेट मुलाच्या पायावरून गेले. त्यामुळे त्याचा पाय गंभीररीत्या चिरडला गेला.

अपघातानंतर मुलाला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor death : फार्महाऊसवरून बनकरच्या मुसक्या आवळल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

SCROLL FOR NEXT